Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

चीनची दंडेली सुरूच : भारताच्या एका शेजारी देशातील काही भागावर केला कब्जा.. काय आहे प्रकार..

काठमांडू : भारतासह लडाखमध्ये आगळीक करण्याचा प्रयत्न करत असलेला चीन आता  नेपाळच्या काही भागावर झपाट्याने कब्जा करत आहे. अलीकडेच नेपाळच्या गृह मंत्रालयाच्या समितीने अहवालात स्पष्ट केले आहे. नेपाळमधील चिनी कब्जाला वाढत्या विरोधानंतर पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनी सीमा अभ्यास करण्यासाठी एक पॅनेल स्थापन केले.

Advertisement

आता या समितीने गेल्या आठवड्यात नेपाळचे गृहमंत्री बाल कृष्ण खांड यांना अहवाल सादर केला आहे.

Advertisement

हुमला परिसरात चीनने घुसखोरी : चीनने नेपाळच्या हुमला भागात घुसखोरी केल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. काठमांडू पोस्टने वृत्त दिले की, या समितीमध्ये सहभागी असलेले सहसचिव जय नारायण आचार्य यांनी खांब क्रमांक 4 ते 13 मधील समस्या ओळखल्या आहेत. अहवालात तज्ज्ञांनी नेपाळच्या राज्य धोरणात सीमा समस्या समाविष्ट करण्यावर आणि त्यांच्या शाश्वत उपायांवर महत्त्व दिले आहे.

Loading...
Advertisement

सीमेशी संबंधित अशा संवेदनशील आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर कायमस्वरूपी यंत्रणेद्वारे लक्ष देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. मात्र तसा कोणताही पुढाकार घेतला नसल्याचे दिसून आले आहे. असा दावा केला जातो की 1963 च्या सीमा प्रोटोकॉलनुसार स्तंभ क्रमांक 5(2) ते किट खोला स्थानापर्यंतचा भाग तांत्रिकदृष्ट्या नेपाळ आणि चीनमधील सीमा म्हणून चिन्हांकित आहे.

Advertisement

नेपाळी प्रदेशात चीन पक्का कालवा बांधत होता. नियमानुसार हा भाग नेपाळच्या अंतर्गत येतो. मात्र चीनने या भागावर दावा केला आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, चीनने नेपाळच्या हद्दीत तार आणि कुंपण घातले असल्याचे आढळून आले आहे. नेपाळच्या हद्दीत 145 मीटर अंतरावर कायमस्वरूपी कालवा बांधण्याचाही चीनचा प्रयत्न होता. त्यानंतर त्याला रस्ताही बांधायचा होता.

Advertisement

नेपाळी लष्कराच्या विरोधानंतर चीनने माघार घेतली :  नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलाला या कालव्याच्या बांधकामासंदर्भात हस्तक्षेप करून निषेध करावा लागला. त्यानंतर चिनी बाजूने वास्तू नष्ट केली. पण ढिगारा अजूनही आहे. चिनी बाजूने खांब क्रमांक 6 (1) लाही घेरले आहे. हा भाग तांत्रिकदृष्ट्या नेपाळचा आहे. त्याचप्रमाणे चीनने खांब क्रमांक 6(1) ते 6(2) मधील भागात आपली उपस्थिती नोंदवण्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply