Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य तयार… कवायतींचा व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्करी जवानांनी जोरदार तयारी केली आहे. आपले जवान लडाखपासून अरुणाचल प्रदेशच्या सीमेपर्यंत पहारा देत आहेत. आपले जवान चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे.

Advertisement

चीनच्या कोणत्याही धोक्यांना सामोरे जाण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) तवांग सेक्टरमध्ये भारतीय लष्कराच्या सैनिकांनी कसरत केली. प्रशिक्षणादरम्यान जवानांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये `मारो या `मारो` अशा घोषणा दिल्या जात आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील तवांग भागात शत्रूचे बंकर नष्ट करण्यासाठी भारतीय लष्कराचे जवान कवायती करत आहेत.

Advertisement

अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी लष्कराने दक्षता वाढवली आहे. M777 हॉविट्झर्स आणि स्वीडिश बोफोर्स तोफांव्यतिरिक्त, प्रगत L70 विमानविरोधी तोफा देखील संवेदनशील फॉरवर्ड पोस्टवर तैनात करण्यात आल्या आहेत. या बंदुका चिनी लढाऊ विमानांना मारण्यास सक्षम आहेत.

Loading...
Advertisement

तवांग परिसरात शत्रूचे बंकर नष्ट करण्यासाठी युद्ध कसरती सुरु आहेत. गेल्या वर्षी 5 मे रोजी पूर्व-लडाख सीमेवरील पांगोंग तलाव भागात भारत-चीनी सैनिक समोरासमोर आले होते. मतभेदांमुळे हिंसक चकमक झाली होती. यानंतर, दोन्ही बाजूंनी हळूहळू हजारो सैनिकांसह शस्त्रास्त्राची तैनाती वाढवली.

Advertisement

मागील वर्षीचा प्रसंग टाळण्यासाठी यंदा भारताकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. चीनला त्यांच्या भाषेतच उत्तर देण्यासाठी आपले जवान सज्ज आहेत. भारतानेही मोठ्या प्रमाणावर जवान सिमेवर तैनात केले आहेत. तसेच वायू दलही हवाई कसरती करत आहे. चीनने भारतीय हद्दीत घुसू नये यासाठी तीनही दले सज्ज आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply