Take a fresh look at your lifestyle.

है तैयार हम : सीमेवरील चिन्यांच्या आगळिकीवर लक्ष ठेवणार भारताचे `हे` ड्रोन

नवी दिल्ली : आता चीनच्या आगळिकीवर  लक्ष  ठेवण्यासाठी भारतानेही वेगवेगळे अभियान हाती घेतले आहे. चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराची ही तयारी आहे. कोणतेही आव्हान पेलण्यासाठी `है तैयार हम` असे म्हणत भारतानेही आता ड्रोनच्या माध्यमातून चीनबरोबरच्या सीमेवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

भारतीय लष्कर आसाममधील मिसामारी आर्मी एव्हिएशन बेसवर हेरॉन मार्क -1 ड्रोनच्या माध्यमातून चीन सीमेजवळ एलएसीवर नजर ठेवून आहे. चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हे ड्रोन सीमेजवळ तैनात करण्यात आले आहेत. भारताने इस्राईलकडून हे ड्रोन घेतले आहे. हे ड्रोन सुमारे 30,000 फूट उंचीवर उडू शकतात आणि सीमेवर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. या ड्रोनच्या मदतीने लष्कर शत्रू सैन्याच्या तयारीवर नजर ठेवू शकते. शेकडो किमी अंतरावरुन त्यांच्याकडून करण्यात येत असलेली बांधकामे आदी दुर्गम भागात लष्कराच्या डोळ्याप्रमाणे काम करते.

Advertisement

अलीकडेच भारतीय लष्कराने इस्रायलकडून हेरॉन मार्क-२ ड्रोन खरेदी करण्याचा करारही केला आहे. चीनच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या दरम्यान हे ड्रोन भारतीय लष्कराला चिनी लष्करावर  लक्ष ठेवण्यास मदत करीन. हे ड्रोन कोणत्याही हवामानात अधिक उंचीवर आणि लांब अंतरावर प्रवास करण्यास सक्षम आहेत.

Advertisement

जून 2020 मध्ये लडाखच्या गलवानमध्ये भारत आणि चिनी सैन्यादरम्यान झालेल्या संघर्षानंतर एलएसीवर तणाव कायम आहे. भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये 13 फेऱ्यांच्या चर्चेनंतरही वाद मिटलेला नाही. चीनचे सैन्य भारताच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर बांधकामे करत आहे. या व्यतिरिक्त इतर राज्यांच्या सीमेवर चिनी सैन्याकडून सीमा उल्लंघनाच्या वारंवार घटना घडल्या आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply