कोरोना काळात भारतीयांनी या गोष्टीत टाकले चीनला मागे.. जाणून घ्या कोणती गोष्ट आहे ती..
नवी दिल्ली : कोरोना महामारीने अनेकांची दिनचर्या कमालीची बदलली आहे. पूर्वीच्या तुलनेत सामान्य लोकांचा मोबाईल स्क्रीन टाइमदेखील वाढला आहे. स्मार्टफोन वापरकर्ते दिवसभरात 4.8 तास त्यांच्या डिव्हाइसवर घालवत आहेत. या दरम्यान, ते सरासरी एक तास व्हिडिओ पाहण्यात घालवतात.
एका अहवालात असे समोर आले की, कोरोना लॉकडाऊन झाल्यापासून अशा वापरकर्त्यांची संख्या आपल्या देशात 350 दशलक्षाहून अधिक झाली आहे. 2018 आणि 2020 च्या तुलनेत अशा लोकांची संख्या 24 टक्क्यांनी वाढली आहे, जी चीनच्या दुप्पट आहे.
व्यवस्थापन सल्लागार फर्म बेन अँड कंपनीच्या ‘ऑनलाईन व्हिडिओ इन इंडिया – की एस्पेक्ट्स’ या अलीकडील अहवालात ही माहिती समोर आली आहे.
कोरोनाच्या काळात देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान लोकांनी ऑनलाइन व्हिडिओ मोठ्या संख्येने पाहिले. लोकांनी व्हिडिओ पाहण्यात घालवलेला वेळ 60 ते 70 टक्क्यांनी वाढला आहे. अहवालानुसार भारतातील त्याची आकडेवारी आणखी वेगाने वाढू शकते. भारतात आज 60 टक्के इंटरनेट वापरकर्ते ऑनलाईन व्हिडिओ पाहतात. तर चीनमध्ये हा आकडा 90 टक्क्यांहून अधिक आहे. भारतात सुमारे 640 दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते आहेत. त्यापैकी सुमारे 550 दशलक्ष स्मार्टफोन वापरणारे आहेत.
या अहवालात असे उघड झाले की, 35 ते 40 कोटी लोकांना अधिक लांबीचे (अधिक वेळ) व्हिडिओ पहायला आवडतात. तर काही लोकांना लहान व्हिडिओ पाहणेही आवडते. लांब व्हिडिओ पाहणाऱ्या लोकांच्या संख्येत पूर्वीपेक्षा मोठी वाढ झाली आहे. 2018 ते 2020 च्या तुलनेत सुमारे दीड पट वाढ झाली आहे.
कोरोना लॉकडाऊन झाल्यापासून असे दिसून आले की, सक्रिय वापरकर्ते लांब व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर दररोज 2.5 तासांपेक्षा जास्त वेळ घालवत आहेत. 2025 पर्यंत अशा वापरकर्त्यांची संख्या 50 कोटींवरून 65 कोटींपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. या अहवालात विश्लेषकांनी 15 सेकंदांपासून ते दोन मिनिटांच्या कालावधीपर्यंतचे व्हिडिओ लहान व्हिडिओ आणि दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळेचे व्हिडिओ लांबीचे व्हिडिओ म्हणून गणले आहेत.
अदानी-अंबानी सुसाट..! पहा नेमकी किती संपत्ती आहे दोघांच्याही खिशात..!
भारतातील शॉर्ट व्हिडिओंची बाजारपेठ टिकटॉकच्या आगमनाने सुरू झाली. चिनी कंपनी सध्या आपल्या देशात बंद आहे. मात्र आपल्या देशातील व्हिडिओची क्रेझ सातत्याने वाढत आहे. लघु व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांची संख्या 3.5 पट वाढते आहे. त्याचवेळी लोकांच्या खर्चातही 12 पटींनी वाढ झाली आहे. २०२० मध्ये किमान एकदा तरी २० कोटी भारतीयांनी लहान व्हिडिओ पाहिले.
एक सक्रिय वापरकर्ता दररोज या प्लॅटफॉर्मवर 45 मिनिटांपर्यंत खर्च करत आहे. इन्स्टाग्राम (फेसबुक), यूट्यूब (गुगल), नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राइमसारख्या मोठ्या टेक कंपन्या छोट्या आणि मोठ्या व्हिडिओंवर लक्ष केंद्रित करत आहेत.