Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अरेरे.. तिथेही पाकिस्तान ठरलाय सर्वात कमजोर; पहा, कोणत्या अहवालाने केलाय ‘हा’ धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली : दहशतवादास कायमच खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानची जगभरात काय किंमत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तसेही या मुजोर देशास चीन सोडला तर जगात कुणीही विचारत नाही. पाकिस्तानच्या कारवाया लक्षात आल्यानंतर आता अमेरिकेनेही या देशाकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. वाढत जाणारी बेरोजगारी आणि गरीबी, अन्न पाण्याचा दुष्काळ, कोलमडलेली अर्थव्यवस्था अशा अनेक समस्या पाकिस्तानमध्ये आहेत. जगात पाकिस्तान यासाठीच ओळखला जात आहे. आताही असाच एक अहवाल आला आहे. ज्याद्वारे जगात पाकिस्तान नेमका कुठे आहे, अन्य देश पाकिस्तानी नागरिकांना आपल्या देशात येऊ देण्यास तयार आहेत का, याचा खुलासा झाला आहे.

Advertisement

हेनले अँड पार्टनर्सने नुकताच जगातील सर्वाधिक शक्तीशाली पासपोर्टची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये जपान आणि सिंगापूर या देशांचे पासपोर्ट सर्वाधिक उत्कृष्ट असल्याचे म्हटले आहे. तर उत्तर कोरिया आणि पाकिस्तान या देशांचे पासपोर्ट सर्वाधिक कमजोर असल्याचे म्हटले आहे. या यादीमध्ये भारतीय पासपोर्ट 90 व्या क्रमांकावर आहे. रिपोर्ट जारी करताना कोविड 19 च्या बाबतीत विचार केलेला नाही. आजमितीस अनेक देशांनी कोरोनामुळे हवाई यात्रांवर निर्बंध टाकले आहेत. तसेच असेही काही देश आहेत ज्यांनी आता निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

या रिपोर्टमध्ये म्हटले आहे, की जपान आणि सिंगापूर या देशांचे पासपोर्ट सर्वाधिक मजबूत स्थितीत आहेत. या देशांचा वीजा मुक्त स्कोर 192 आहे. म्हणजेच, या देशातील पासपोर्टधारक नागरिक वीजा नसला तरीही 192 देशांचा प्रवास करू शकतात. अफगाणिस्तान, सिरिया, इराक, पाकिस्तान आणि यमन या देशांचे पासपोर्ट सर्वाधिक कमजोर आहेत. पाकिस्तानचा वीजा मुक्त स्कोर फक्त 31 आहे. म्हणजेच पाकिस्तानी पासपोर्टधारक नागरिक जगातील फक्त 31 देशांमध्ये वीजा नसला तरी प्रवास करू शकतात.

Loading...
Advertisement

जर्मनी आणि दक्षिण कोरिया या देशांचा वीजा मुक्त स्कोर 190 आहे. इटली, लेक्झेंबर्ग, स्पेन 189, ऑस्ट्रिया आणि डेन्मार्क 188, ब्रिटेन, अमेरिका, चेक गणराज्य, ग्रीस, माल्टा, नॉर्वे या देशांचा वीजा मुक्त स्कोर 185 असा आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply