नवी दिल्ली : अफगाणिस्तान मध्ये तालिबानी राज्यात सर्वसामान्य नागरिक भरडले जात आहेत. सध्या या देशात काय परिस्थिती आहे, भविष्यात काय होणार याबाबत माहिती देणारे अनेक अहवाल आले. येथील नागरिकांना मदत करण्याचेही आवाहन केले गेले. मात्र, परिस्थितीत काही फरक पडलेला नाही. आता तर युनिसेफने आणखीच धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. तालिबानी राज्यातील अराजकतेमुळे सर्वात जास्त त्रास येथील लहान मुलांना सहन करावा लागत असल्याचे युनिसेफने म्हटले आहे.
अफगाणिस्तान मध्ये या वर्षात तब्बल 10 लाख मुले उपासमारीच्या संकटात भरडले जाऊ शकतात, असा इशारा युनिसेफने या अहवालाद्वारे दिला आहे. या मुलांचे कुपोषण रोखायचे असेल तर येथे तत्काळ मदत उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. तालिबानने कब्जा केल्यानंतर मदत देणाऱ्या ज्या काही संस्था होत्या, त्यांनी देश सोडला आहे. या कारणामुळे अडचणी जास्त वाढल्या आहेत.
देशात सध्या अन्न आणि पाण्याची प्रचंड कमतरता आहे. त्यामुळे लाखो लोक उपासमारीच्या संकटाचा सामना करत आहेत. लहान मुलांची अवस्था अतिशय दयनीय आहे. या वर्षात दहा लाख मुले कुपोषित होण्याची शक्यता आहे. जर वेळेवर अन्न आणि औषधोपचार मिळाले नाही तर अनेक जण दगावण्याचीही भिती युनिसेफने व्यक्त केली आहे.
एका अंदाजानुसार, देशात जवळपास 42 टक्के मुले शिक्षणापासून वंचित आहेत. डब्ल्यूपीएफने दिलेल्या माहितीनुसार, आजमितीस अफगाणिस्तान मध्ये 22 लाख मुले कुपोषणाच्या विळख्यात सापडली आहेत. जर वेळ असताना या संकटावर मार्ग काढला गेला नाही तर भविष्यात अत्यंत गंभीर मानवीय संकट निर्माण होऊ शकते, असा इशारा आंतरराष्ट्रीय संस्थांनी दिला आहे. युनिसेफचे कार्यकारी निदेशक हेनरीटा फोर यांनी सांगितले, की देशात मुलभूत गोष्टींचा प्रचंड दुष्काळ आहे. पुढील काही महिन्यात देशात मोठा दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील परिस्थिती आधिक खराब होण्याची शक्यता आहे.
. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.