Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

त्यांनी दिलाय इस्लामिक कट्टरवाद्यांना झटका; पहा कशा पद्धतीने केलीय धडाकेबाज कारवाई

दिल्ली : इस्लामिक कट्टरवाद असो की इतर कोणत्याही धार्मिक माथेफिरुंचा त्रास हे आता जगाचे वास्तव बनलेले आहे. अशावेळी अशा माथेफिरूंच्या ठिकाणांना आणि समाजात विष पसरवण्यासाठीचा प्रयत्न करणाऱ्या संस्थांना लगाम घालणे ही काळाची गरज बनली आहे. असाच झटका फ्रांस या युरोपिअन देशाने दिला आहे.

Advertisement

इस्लामिक कट्टरवादाविरोधात कडक मोहीम राबवताना धडक कारवाई करत फ्रान्सने एका वर्षात 30 मशिदी बंद केल्या आहेत. फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डार्मानिन म्हणाले की, 89 मशिदींची तपासणी करण्यात आली आणि त्यातील एक तृतीयांश बंद करण्यात आल्या. फ्रान्समधील वादग्रस्त मशिदी बंद करण्याची मोहीम नोव्हेंबर 2020 मध्ये सुरू झाली होती. यापूर्वी, गेराल्ड यांनी म्हटले होते की, “अलगाववाद विरोधी कायदा” लागू होण्यापूर्वी अतिरेक्यांना आश्रय देणारी 650 ठिकाणे बंद करण्यात आली होती.

Loading...
Advertisement

फ्रेंच पोलिसांनी देशातील 24000 ठिकाणी जाऊन तपास केला होता. तुर्कीची वृत्तसंस्था अनाडोलूच्या मते, गेराल्डने ताज्या निवेदनात म्हटलेय की नोव्हेंबर 2020 पासून अतिरेकीपणाला प्रोत्साहन देणाऱ्या 89 मशिदींची चौकशी करण्यात आली होती. आता त्यातील एक तृतीयांश बंद करण्यात आली आहे. देशातील विविध भागात असलेल्या आणखी 6 मशिदी बंद करण्याचा विचार करत आहोत. एकूणच यामुळे इस्लामिक कट्टरवाद्यांना मोठा झटका बसला आहे.

Advertisement

फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी सांगितले की, ड्रग्स तस्करी आणि घरगुती हिंसाचाराच्या आरोपींना निवास परवाने देखील वाढवले ​​जाणार नाहीत. एवढेच नाही तर फ्रान्सने अल्जेरिया, ट्युनिशिया आणि मोरोक्कन लोकांसाठी व्हिसाची संख्या मोठ्या प्रमाणात मर्यादित केली आहे जेणेकरून ज्यांना फ्रान्सने परत पाठवले आहे, ते त्यांना सहज परत घेऊ शकतील. यापूर्वी फ्रान्समध्ये सर्वोच्च घटनात्मक प्राधिकरणाने अलगाववाद विरोधी कायदा मंजूर केला होता. हे विधेयक राष्ट्रीय सभेने मंजूर केले. या विधेयकात मूलतत्त्ववाद्यांना लगाम घालण्यासाठी अनेक अत्यंत कडक तरतुदी करण्यात आल्या आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply