Take a fresh look at your lifestyle.

काय सांगता.. ? तालिबानने ‘त्या’ साठी भारत सरकारला पाठवलेय पत्र; पहा, काय म्हटलेय ‘त्या’ पत्रात

नवी दिल्ली : अफगाणिस्तान मध्ये तालिबानने सरकार गठीत केले असले तरी सरकार चालवायचे कसे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जगातील अनेक देशांनी अजूनही तालिबानी सरकारला मान्यता दिलेली नाही. जागतिक वित्तीय संस्थांनीही निर्बंध टाकले आहेत. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. तालिबानच्या सध्याच्या कारवाया पाहता कोणताही देश विश्वास ठेवण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत तालिबान सरकारने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे सहकार्य मागितले आहे. आता तालिबान सरकारने चक्क भारताला पत्र पाठवले आहे.

Advertisement

15 ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तान काबीज केल्यानंतर भारताने अफगाणिस्तान-भारत विमान सेवा बंद केली होती. पण, आता तालिबान सरकारने ही बंद केलेली विमान सेवा भारताने पुन्हा सुरू करावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच भारत सरकारला पत्र सुद्धा पाठवले आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, तालिबानने या प्रकरणी भारत सरकारला पत्र लिहीले आहे. अफगाणिस्तान नागरी उड्डयन प्राधिकरणने 7 सप्टेंबर रोजी हे पत्र पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी आता केंद्र सरकार काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

तालिबानच्या अंतरिम सरकारला जगातील मोठ्या देशांसह भारतानेही अद्याप मान्यता दिलेली नाही. तालिबान सरकारला मान्यता मिळावी यासाठी चीन आणि पाकिस्तान प्रयत्न करत आहेत. मात्र, यामध्ये अद्याप यश मिळालेले नाही. तालिबानला सध्या पैशांचीही कमतरता जाणवत आहे. यासाठी चीनने आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच अमेरिका सुद्धा काही प्रमाणात मदत करणार आहे.

Advertisement

दरम्यान, तालिबानने भारत सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, की देशातील विमानतळ आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे. यासाठी कतर या मित्र देशाचे सहकार्य मिळाले आहे. त्यामुळे आता भारताने आता भारत-अफगाणिस्तान विमान सेवा पुन्हा सुरू करावी.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply