Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तानला आणखी एक झटका..! तालिबान्यांना मदत करणे ठरतेय धोक्याचे; युरोपातील ‘या’ देशानेही केलाय विरोध

रोम : अफगाणिस्तान मधील तालिबानी सरकारला जगातील अन्य देशांनी मान्यता द्यावी, यासाठी पाकिस्तानचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आपल्या देशात कोरोना महामारी, गरीबी, बेरोजगारी, दुष्काळ यांसारखी भयानक संकटे निर्माण झाली आहेत. मात्र, या समस्यांकडे दुर्लक्ष करुन पाकिस्तानी राज्यकर्ते आता तालिबानला आंतरराष्ट्रीय समुदायाची मान्यता मिळवून देण्यासाठी धडपड करत आहे. याकामी चीनही मदत करत आहे. मात्र, असे असतानाही पाकिस्तान वारंवार अपयशी ठरत आहे.

Advertisement

तालिबानच्या मुद्द्यावर आधीच पाकिस्तानला अनेक झटके बसले आहेत. त्यात आता युरोपातील आणखी एका देशाची भर पडली आहे. युरोपातील इटली या देशाने तालिबानला मान्यता देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. पाकिस्तानसाठी हा आणखी एक झटका मानला जात आहे.

Advertisement

अफगाणिस्तान मध्ये तालिबानने सत्ता मिळवली असली तरी तालिबानच्या सरकारला मान्यता दिली जाऊ शकत नाही. मात्र, मानवीय दृष्टीकोनातून अफगाणिस्तानमधील नागरिकांकडे पाहिले पाहिजे. स्थानिकांना मदत केली पाहिजे, असे इटलीने म्हटले आहे. विशेष म्हणजे, तालिबानने आपल्या मंत्रिमंडळात 17 दहशतवाद्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे तालिबानला मान्यता देणे अशक्य आहे, असे मत इटलीचे परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केले. याबाबत रॉयटर्सने बातमी दिली आहे.

Advertisement

तालिबान सरकारला अन्य देशांनी मान्यता द्यावी, यासाठी पाकिस्तान धडपडत आहे. मात्र, त्यास प्रतिसाद मिळत नाही. याआधी पाकिस्तानने सार्क देशांमध्ये तालिबानचा समावेश करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, त्यास सार्क देशांनी नकार देत बैठकच रद्द केली. सार्क देशांची बैठक न्यूयॉर्कमध्ये होणार होती. मात्र, पाकिस्तानने असा प्रस्ताव ठेवला. त्यास अन्य देशांनी विरोध करत बैठक रद्द केली.

Advertisement

त्यानंतर युरोपीय देशांनी तालिबानला मान्यता द्यावी, यासाठी पाकिस्तानने प्रयत्न सुरू केले होते. मात्र, सुरुवातीलाच झटका बसला आहाइटलीने नकार दिला आहे. त्यानंतर आता युरोपातील अन्य देशांचे काय धोरण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अफगाणिस्तान मध्ये सध्या ज्या घडामोडी घडत आहेत, त्या पाहता युरोपीय देश तालिबानला मान्यता देण्यास तयार होतील, याची शक्यता कमीच आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply