Take a fresh look at your lifestyle.

तालिबानने पाकिस्तानला धमकावले..! ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय गंभीर इशारा; पहा, कशामुळे होतोय वाद

नवी दिल्ली : तालिबान्यांना सातत्याने पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला आता वेगळेच अनुभव येत आहेत. तालिबान आणि पाकिस्तान मध्य आता खटके उडू लागले आहेत. तालिबानने तर आता पाकिस्तानला अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला आहे. अफगाणिस्तानच्या बाबतीत हस्तक्षेप करणे आता पाकिस्तानने बंद करावे, अशा शब्दांत तालिबानने पाकिस्तानला इशारा दिला आहे. यावरुन आता तालिबानच्या बदलत चाललेल्या धोरणाचा अंदाज येतो.

Advertisement

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी याआधी एका मुलाखतीत सांगितले होते, की अफगाणिस्तान मध्ये जर सर्वसमावेशक सरकार बनले नाही तर देशात गृहयुद्ध भडकू शकते, आणि हा देश पुन्हा दहशतवाद्यांच्या ताब्यात जाईल. इम्रान खान यांचे वक्तव्य तालिबानला मात्र आजिबात मान्य नाही. त्यामुळेच तर त्यांनी तितक्याच जोरदारपणे पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले आहे. इम्रान खान यांना आमच्या देशाच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. मात्र, त्यांनी असे केले तर आम्हाला देखील पाकिस्तानमध्ये दखल देण्याचा अधिकार मिळेल, असे तालिबानच्या सोशल मिडिया प्रमुखाने सांगितले.

Advertisement

पाकिस्तानने सध्या अफगाणी नागरिकांना त्यांच्या देशात प्रवेश देणे सुद्धा बंद केले आहे. मानवतेच्या आधारे पाकिस्तानने अफगाणी नागरिकांना प्रवेश द्यावा, असे आवाहन तालिबानी नेत्यांनी केले होते. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे अफगाणी लोक सध्या अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर उपाशीपोटी ताटकळत उभे आहेत. यातील काही लोकांचा मृत्यू झाल्याच्याही बातम्या आता येत आहेत. या प्रकारामुळेही तालिबान पाकिस्तानवर नाराज आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानी राज्यकर्ते जरी तालिबानचे समर्थन करत असले तरी येथील परिस्थिती मात्र वेगळीच आहे.

Advertisement

पाकिस्तानने याआधीही अफगाणिस्तान बरोबर पाकिस्तानी चलनात व्यापार करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयामागे पाकिस्तानचा उद्देश लक्षात आल्याने तालिबानी नेत्यांनी पाकिस्तानचा हा डाव हाणून पाडला होता. त्यानंतरही पाकिस्तान वेगवेगळ्या मार्गांनी अफगाणिस्तान मध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहे. याकामी त्यास चीनचीही मदत मिळत आहे. अफगाणिस्तानमध्ये सध्या घडणाऱ्या या घडामोडींवर मात्र जगातील अन्य देशांनी शांत राहण्यालाच प्राधान्य दिले आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply