वॉशिंग्टन : अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकारला भारत आणि अमेरिकेने अत्यंत स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. जगातील कोणत्याही देशावर हमला करण्यासह आतंकवाद्यांना संरक्षण देण्यासाठी अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर तालिबानने आजिबात करू नये, असा इशारा या दोन्ही देशांनी दिला आहे. अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानी राजवट आहे. तालिबानचा इतिहास पाहता अफगाणिस्तान मधील घडामोडींमुळे जवळच्या देशांना धोका निर्माण झाला आहे. जगातील अन्य देशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही तालिबान धोकादायक आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेने तालिबानला हा इशारा दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात काल द्विपक्षीय बैठक पार पडली. त्यानंतर दोन्ही देशांकडून संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. अफगाणिस्तानमध्ये सध्या मदत कार्य करणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघ आणि त्यांच्या विशेष संस्थांना पूर्ण संरक्षण द्यावे, असे आवाहन करण्यात आले. संयुक्त राष्ट्रांच्या समितीने प्रतिबंधित केलेल्या दहशतवादी संघटनांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.
भारत आणि अमेरिकेने दिलेला हा इशारा तालिबान गांभीर्याने घेणार किंवा नाही, याचे उत्तर आताच देता येणे शक्य नाही. कारण, सध्या तालिबानला चीन, पाकिस्तान, तुर्की, कतर सारख्या देशांचा पूर्ण पाठिंबा आहे. या देशांनी तालिबानचे वेळोवेळी समर्थन केले आहे. चीनने तर तालिबानला आर्थिक मदत देण्याचीही घोषणा केली आहे. तसेच हे देश अमेरिकेच्या विरोधात एकत्र येत आहेत. भारताचाही विरोध करत आहेत. पाकिस्तान तर शत्रूच आहे. चीनचेही धोरण तसेच आहे. आणि या देशांचा तालिबानला पाठिंबा आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेच्या इशाऱ्याचा तालिबानवर काय परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.