नवी दिल्ली : प्रत्येक वेळी तालिबानला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानची अवघ्या जगात बदनामी होत आहे. मात्र, यातून पाकिस्तानने कोणताही धडा घेतलेला नाही. आता तर तालिबान बरोबर सुद्धा वाद होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक अफगाणी नागरिक देश सोडून पाकिस्तान मध्ये दाखल होण्याच्या तयारीत आहेत. मात्र, पाकिस्तान या नागरिकांना आपल्या देशात प्रवेश देण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिक बॉर्डरवरच उपाशीपोटी ताटकळत उभे आहेत. इतकेच नाही तर यातील काही नागरिकांचा मृत्यू झाल्याच्याही बातम्या येत आहेत. ज्या लोकांकडे पाकिस्तान किंवा कंधारचे ओळखपत्र आहे अशाच लोकांना प्रवेश देण्यात येत आहे.
न्यूयॉर्क पोस्टने आपल्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे, की माजल गेटजवळ आणखी दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. काही प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले की पाकिस्तान त्यांच्या देशात येण्यास आजिबात परवानगी देत नाही. विशेष म्हणजे, ज्या नागरिकांकडे अफगाण राष्ट्राचे ओळखपत्र आहे ते ओळखपत्र सुद्धा पाकिस्तानकडून नाकारण्यात येत आहे. तालिबानने सुद्धा पाकिस्तानला आवाहन केले होते, की मानवतेच्या आधारावर पाकिस्तानने लोकांना देशात प्रवेश द्यावा, मात्र या आवाहनाचा काहीच उपयोग झाल्याचे दिसत नाही.
कारण, पाकिस्तान अफगाणी नागरिकांना प्रवेश देण्यास तयार नाही. नागरिकांचे मात्र विनाकारण हाल होत आहेत. अफगाणिस्तान मध्ये परत गेले तर तालिबान्यांच्या त्रासाचा सामना करावा लागेल याची भीती त्यांना आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत देश सोडून दुसऱ्या देशात आश्रय घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पाकिस्तान अफगाणिस्तानच्या जवळ आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानात आश्रय घेणे सर्वात सोपे आहे. त्यामुळे अफगाणी नागरिक पाकिस्तानला प्राधान्य देत आहेत. पाकिस्तानने मात्र वेगळेच धोरण घेतले आहे. यामध्ये नागरिक मात्र भरडले जात आहेत.
. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.