Take a fresh look at your lifestyle.

बापरे.. ‘त्या’ संकटामुळे दरवर्षात होतात ‘इतके’ मृत्यू; ‘डब्ल्यूएचओने’ दिलाय ‘हा’ गंभीर इशारा; नव्या गाइडलाइन्स केल्या जारी

जिनेव्हा : जगभरात अगदीच वेगाने वाढत असलेल्या वायू प्रदूषणाच्या संकटाची दखल घेणे जागतिक आरोग्य संघटनेस भाग पडले आहे. कारण, तब्बल 15 वर्षांनंतर संघटनेने प्रथमच हवा गुणवत्तेबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आरोग्य संघटनेच्या एका अहवालात म्हटले आहे, की वायू प्रदूषणामुळे जगभरात दर वर्षात तब्बल 70 लाख लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे या घातक संकटास रोखण्यासाठी कडक उपाययोजना तयार करुन त्यांची प्रत्यक्षात तितक्याच कठोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

Advertisement

जगभरात आज प्रदूषण अत्यंत वेगाने वाढत चालले आहे. या संकटाचा त्रास प्रत्येक देशाला होत आहे. मानवी आरोग्यावर याचे अत्यंत गंभीर परिणाम होत आहे. लहान मुलांच्या मानसिक आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे. हे संकट काही आजचे नाही. ज्यावेळी प्रदूषणाची समस्या निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. त्याचवेळी उपाययोजना करुन ही समस्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे होते.

Advertisement

मात्र, त्यावेळी कुणीही याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. आता मात्र प्रदूषण आवाक्याबाहेर गेले आहे. प्रदूषण कमी करायचे म्हटले तरी आता ते शक्य होईल असे दिसत नाही. वायू प्रदूषणाचा त्रास इतका वाढला आहे की दर वर्षी लाखो लोकांना प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे या समस्येची दखल घेणे आरोग्य संघटनेस भाग पडले आहे.

Advertisement

आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये म्हटले आहे, की जीवाश्म इंधनाच्या उत्सर्जनात आढळून येणारे पार्टिक्यूलेट मॅटर आणि नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. सध्या आपण जे जलवायू परिवर्तनाच्या संकटाचा अनुभव घेत आहोत त्याचे कारण वायू प्रदूषण आहे. तसेच या प्रदूषणाचा मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर अत्यंत घातक परिणाम होत आहे. PM 2.5 आणि PM 10, ओझोन, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन मोनोक्साइडच्या विळख्यात सापडल्याने दरवर्षी 70 लाख लोक मृत्यूमुखी पडत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

Advertisement

आरोग्य संघटनेने ज्या काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्यांचे जगातील देशांनी पालन करावे अन्यथा जगभरातील मानवतेवर मोठे संकट येईल, असा इशारा आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी दिला आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply