Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तानचा डाव फसला..! तालिबानला विरोध करत सार्क देशांनी घेतला ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली : अफगाणिस्तान मध्ये सध्या घडणाऱ्या घडामोडी पाहून जगातील सर्वच देशांनी मौन बाळगले आहे. मात्र, पाकिस्तान तालिबानचे राजरोसपणे समर्थन करत आहे. तालिबान बाबत धोरण घेताना जागतिक राजकारणात पाकिस्तानची बदनामी होत आहे. तरी देखील येथील राज्यकर्त्यांना शहाणपणा सुचलेला नाही. आता तर पाकिस्तानने तालिबानबाबत अशीच एक चमत्कारिक मागणी केली आहे. त्याचा परिणाम मात्र पाकिस्तानसाठी नुकसानकारकच ठरला आहे.

Advertisement

अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे होत असलेल्या सार्क देशांच्या परिषदेत तालिबानलाही सहभागी करुन घ्यावे, अशी मागणी पाकिस्तानने केली होती. मात्र, यानंतर ही परिषदच रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेतील (सार्क) सहयोगी देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक 25 सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीआधीच पाकिस्तानने अशी अजब मागणी केली. अर्थातच या मागणीस कुणाचा पाठिंबा मिळाला नाहीच. उलट बहुतांश देशांनी यास विरोधच केला.

Advertisement

तरी देखील पाकिस्तानने यातून शहाणपणा घेतला नाही. यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या अशरफ गनी सरकारमधील परराष्ट्र मंत्र्यांना या बैठकीत सहभागी करुन घेऊ नये, अशी अट ठेवली. यासही अन्य देशांनी विरोध केला. यानंतर ही बैठकच रद्द करण्याचा निर्णय सार्क देशांनी घेतला. पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का आहे. तरी देखील पाकिस्तानी राज्यकर्ते यातून काही धडा घेतील याची शक्यता कमीच आहे.

Advertisement

दरम्यान, तालिबान सरकारला चीन आणि पाकिस्तानने मान्यता दिली असली तरी अन्य देशांनी याबाबत मौन बाळगले आहे. कुणीही तालिबान सरकारला अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यामुळे जागतिक पातळीवर तालिबानच्या अडचणी वाढल्या आहेत. आता तर तालिबानी नेत्यांमध्येत सत्तेसाठी जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तान आधिकच अशांत झाला आहे. त्याचा त्रास शेजारील देशांना होणार आहे. अफगाणिस्तान मधील या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न चीन आणि पाकिस्तान सारखे देश करत आहेत.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply