Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाचे नियम ब्रिटेनने केले पण, वादळ उठलेय भारतात; पहा, ब्रिटेनच्या ‘त्या’ नियमांवर का होतोय संताप ?

नवी दिल्ली : जगभरात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. प्रत्येक देश या आजारावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, काही देशांनी असे अजब नियम केले आहेत की ज्यांचा त्रास दुसऱ्या देशांतील नागरिकांना होत आहे. ब्रिटेननेही कोरोना संबंधित प्रवासाचे असे काही नियम केले आहेत की ज्यामुळे भारतात वादळ उठले आहे. भारतातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ब्रिटेनच्या या नियमांवर टीकेची झोड उठवली आहे. या नियमांनुसार कोविशील्ड लसीचे दोन डोस घेतलेल्या भारतीय नागरिकांनाही लस न घेतलेल्या व्यक्तींप्रमाणेच समजले जाणार आहे.

Advertisement

ब्रिटेनच्या आंतरराष्ट्रीय प्रवास नियमांनुसार, भारतीयांसह अधिकृत कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या लोकांना रवाना होण्याआधी कोरोना चाचणी करावी लागणार आहे. त्यानंतर आगमनाच्या दुसऱ्या आणि आठव्या दिवशी पीसीआर चाचणी करावी लागणार आहे. देशात प्रवेश केल्यानंतर दहा दिवसांपर्यंत स्वतःला आयसोलेट करावे लागेल. या नियमांमुळे भारतात मात्र संताप व्यक्त केला जात आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, की कोविशील्ड लस ब्रिटेनमध्ये विकसित केली होती.

Advertisement

भारताच्या सीरम इन्स्टिट्यूटने ब्रिटेनमध्ये सुद्धा या लसीची निर्यात केली आहे. असे असतानाही ब्रिटेनने घेतलेला हा निर्णय अजबच म्हणावा लागेल. काँग्रेस नेते शशि थरुर यांनीही या नियमांवर जोरदार टीका केली आहे. लस घेतलेल्या भारतीय नागरिकांना क्वारंटाइन होण्यास सांगणे आपत्तीजनक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

दरम्यान, ज्या देशांच्या लसींना ब्रिटेनने मान्यता दिली आहे, अशा देशांच्या यादीत भारताचे नाव नाही. याचा अर्थ ज्या भारतीयांनी कोविशील्ड लस घेतली आहे. त्यांना अजूनही लस नसलेल्या लोकांप्रमाणे अनिवार्य निर्बंध राहतील. विशेष म्हणजे, ब्रिटनने ज्या देशांना नियमांमधून सूट दिली आहे त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, बहारीन, इस्रायल, सौदी अरेबिया, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया या देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये फक्त एस्ट्राजेनेका लस (भारतात कोविशील्ड नावाने तयार केलेली) वापरली जात आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply