Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

जगावर युध्दाचे संकट…तेथील परिस्थिती बिघडली…वाचा कारण….

ऑस्ट्रेलियाने अमेरीका आणि ब्रिटनसोबत केलेल्या करारानुसार ऑस्ट्रेलिया अणुउर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यांची निर्मीती करेल, ज्यामुळे इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांतता टिकवून ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जाईल.

दिल्ली : दुसऱ्या महायुध्दानंतर जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू झाले. मात्र त्यानंतर शीतयुध्दातून तिसऱ्या महायुध्दाची ठिणगी पडेल का?  अशी भीती जागतिक स्तरावर व्यक्त केली जात होती. परंतू शीत युध्द थांबले मात्र दहशतवादाच्या आडून मोठ्या प्रमाणावर युध्दाची शक्यता निर्माण व्हायला लागली. त्यातच आता जागतिक महासत्ता होण्यासाठी चीन अमेरीकेला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. तर अनेक देशांमध्ये शस्रास्रांची स्पर्धा वाढली  आहे. त्यातच भारत पाकिस्तान यांच्यातील काश्मीरचा मुद्दा डोकं वर काढत आहे. तर चीन भारत सीमेवर मोठा तणाव निर्माण झाला आहे. या सर्व परिस्थितीत जगावर पुन्हा युध्दाचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Advertisement

प्रशांत महासागरामध्ये चीनने आपली दादागिरी वाढवायला सुरूवात केली आहे. त्यामुळे अमेरीकेने प्रशांत महासागरात गस्त घालायला सुरूवात केली आहे. त्यामुळे चीनसोबत जागतिक युध्द होण्याची शक्यता निर्माण व्हायला सुरूवात झाली आहे.  तर चीन जो दृष्टीकोण अवलंबत आहे, त्यावरून युध्दाची भीती अधिकच गडद होत आहे. त्यामुळे चीन या युध्दात ब्रिटनलाही खेचू शकतो.  तर या युध्दात अण्वस्रांचा वापर होऊ शकतो, अशी भीती ऑस्ट्रेलियाने व्यक्त केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री (Peter Dutton ) यांनी आपल्या सैन्याला युध्दाची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement

ऑस्ट्रेलियाने AUKUS कराराच्या अंतर्गत अमेरीका आणि ब्रिटनसोबत नवीन युती केली आहे. त्यानुसार ऑस्ट्रेलियाला आठ आण्विक पाणबुड्या आणि प्रगत लष्करी तंत्रज्ञान देण्यात येणार आहे. तर प्रादेशिक शांतता टिकवण्यासाठी हा करार आवश्यक आहे, असे पीटर ड्यूटन यांनी सांगितले. मात्र चीन शांततेऐवजी युध्दाची परिस्थिती निर्माण करत आहे. तसेच चीनी लोक तैवानच्या संदर्भात त्यांच्या हेतूबद्दल स्पष्ट आहेत. तर अमेरीकेच्या मनातदेखील तैवान प्रश्नावर शंका आहे. त्यामुळे अमेरीका, ऑस्ट्रेलिया यापैकी कोणालाही संघर्ष नको आहे. परंतू चीनची भुमिका हा एक प्रश्न आहे.

Loading...
Advertisement

ऑस्ट्रेलियाने अमेरीका आणि ब्रिटनसोबत केलेल्या करारानुसार ऑस्ट्रेलिया अणुउर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यांची निर्मीती करेल, ज्यामुळे इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांतता टिकवून ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जाईल. त्यामुळे जेव्हापासून या कराराची बातमी समोर आली आहे, तेव्हापासून चीन संतापला आहे. त्यामुळे चीनने यावर प्रतिक्रीया देतांना म्हटले आहे की, या करारानुसार प्रादेशिक शांतता आणि स्थिरता केवळ पोकळ वल्गना ठरेल. तसेच ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरीका शीतयुध्दाच्या मानसिकतेने वागत आहेत. त्यामुळे शस्रास्रांची स्पर्धा वाढून आंतरराष्ट्रीय शांततेच्या उद्दिष्टाला हानी पोहचू शकते, अस आरोप चीनने केला आहे.

Advertisement

चीनी समुद्राच्या लढाईत ब्रिटनला ओढले जाण्याच्या शक्यतेमुळे ब्रिटीश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी संसदेत कराराचे समर्थन केल. तर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या संरक्षणासाठी कटीबध्द असल्याची भावना व्यक्त केली. मात्र चीनच्या विमानांनी पुन्हा एकदा तैवान सीमेवर घुसखोरी केली आहे. त्यात चीनचे आठ लढाऊ विमाने आणि दोन सहाय्यक विमाने तैवानच्या हद्दीत घुसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रदेशातील तणाव वाढत आहे. म्हणून येत्या काळात जगावर युध्दाचे संकट ओढावण्याची शक्यता आहे.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply