म्हणून अमेरिकेवर बिथरलाय पाकिस्तान; ‘त्या’ मुद्द्यावर इम्रान खान यांनी अमेरिकेला केलेय टार्गेट
नवी दिल्ली : अफगाणिस्तान मध्ये तालिबान्यांना राजरोस मदत करणाऱ्या पाकिस्तानची अवघ्या जगात बदनामी होत आहे. अफगाणिस्तान मध्ये चीनच्या मदतीने पाकिस्तान सध्या ज्या कारवाया करत आहे. त्याने तालिबानला पाठबळ मिळत आहे. मात्र, जागतिक पातळीवर पाकिस्तानला अपमान सहन करावा लागत आहे. अमेरिकेने तर पाकिस्तानवर थेट आरोप केले आहेत. अफगाणिस्तान मध्ये सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यास पाकिस्तान सुद्धा जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. या आरोपांमुळे पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा तिळपापड झाला आहे. त्यांनीही आता अमेरिकेवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका मुलाखतीत अमेरिकेच्या धोरणांवर टीका केली आहे. ते म्हणाले, की अमेरिकेने आतापर्यंत फक्त वापर करुन घेतला आहे. दहशतवादा विरोधातील अमेरिकेच्या संघर्षात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. अफगाणिस्तान मध्ये अमेरिकेने वीस वर्षांच्या काळात पाकिस्तानचा फक्त वापर केला, असा आरोप त्यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत केला.
तालिबान आणि या परिसरातील अन्य संघटनां बरोबर पाकिस्तानचे चांगले संबंध आहेत. याशिवाय, अमेरिकेने दहशतवादाविरोधातील युद्धादरम्यान या गटाला पाठिंबा दिल्याचा आरोप पाकिस्तानवर केला आहे. इम्रान खान यांनी मात्र सीएनएन संस्थेस दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप फेटाळून लावला. अफगाणिस्तान सीमेवर पाकिस्तानच्या हद्दीत अमेरिकेच्या ड्रोनद्वारे सर्वाधिक पाळत ठेवली गेली होती, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सध्या जागतिक राजकारण बदलले आहे. पाकिस्तान आता चीनच्या गटात सामील झाला आहे. त्यामुळे अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात दुरावा आला आहे. मात्र, चीनचे पाठबळ मिळाल्याने आता पाकिस्तानचे अमेरिकेबाबत धोरण सध्या बदलले आहे. पाकिस्तानने आता अमेरिकेवरही टीका करण्यास सुरुवात केली आहे.
. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.