Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अन्यथा विराट अडचणीत…वाचा असे का म्हणाले संजय मांजरेकर…

विराट कोहलीने चेंडू ऑफ-स्टंपच्या बाहेर सोडला नाही तर त्याला धावांसाठी संघर्ष करत रहावा लागेल.

दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या फॉर्मसाठी संघर्ष करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विराटचा फॉर्म हरवल्याने क्रिकेटविश्वात चिंता व्यक्त केली जात आहे. तर अनेक सामन्यांमध्ये विराटची बॅट तळपलीच नाही. विराटच्या हरवलेल्या फॉर्मबद्दल इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसेन म्हणाला होता की, विराटला नवीन चेंडूचा सामना करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. कोहलीची थोडी ‘तांत्रिक समस्या’ अशी आहे की, त्याने चेंडू ऑफ-स्टंपच्या बाहेर सोडला पाहिजे.
डेली मेलला दिलेल्या स्तंभात हुसेन म्हणाला, विराट तिसऱ्या दिवशी एका स्पेलमधून गेला. जो एका जुन्या चेंडूच्या विरूद्ध जिथे तो चांगला टाकत होता. परंतु  विराटसाठी नवीन चेंडू सोडणे कठीण आहे कारण चेंडू स्विंग करतो. तसेच विराट धावांसाठी करत असलेल्या संघर्षावर भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर म्हणाले की, विराट कोहलीने चेंडू ऑफ-स्टंपच्या बाहेर सोडला नाही तर त्याला धावांसाठी संघर्ष करत रहावा लागेल.
सध्या इंग्लडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत कोहली बाहेरील चेंडू खेळताना अनेक वेळा बाद झाला. जे चेंडू सोडून द्यायला हवे होते. मात्र त्याने बाहेर जाणाऱ्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला आणि बाद झाला. जेम्स अँडरसन आणि ऑली रॉबिन्सनविरुद्ध खेळताना विराटला धावांसाठी संघर्ष करावा लागला. त्यामुळे विराट कोहलीला सध्या बराच काळ शतक झळकावता आलेले नाही.
मांजरेकर म्हणाले की, 2018 मध्ये विराट कोहलीने ज्या पध्दतीने जोरदार पुनरागमन केले. त्यातून त्याने धडा घेतला पाहिजे. क्रिकेट समालोचक म्हणाले की, कोहलीच्या पुढच्या  पायाच्या खेळामुळे सरासरी गोलंदाज जागतिक फलंदाजांसारखे दिसू लागले आहे. या मालिकेतील आतापर्यंतच्या तीन कसोटींमध्ये विराटने 24.80 च्या सरासरीने 124 धावा केल्या आहेत. ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.  मात्र 2014 चा इंग्लंड दौरा विराट कोहलीसाठी खूप वाईट होता. तेव्हाही कोहली धावासाठी ध़डपडत होता. मात्र नंतर त्याने जोरदार पुनरागमन करत स्वतःचं अस्तित्व दाखवून दिलं.
माजी सलामीवीर संजय मांजरेकर हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना म्हणाले की, विराट कोहली सध्या त्याच्या ऑफ-साइडच्या मुद्द्याशी लढत आहे. तर 2014 प्रमाणे विराटला संघर्ष करावा लागत आहे. त्याने 2018 सारखे बाहेर जाणारे चेंडू सोडायला हवेत. अन्यथा विराटच्या अडचणीत वाढ होईल.
विराट पुढच्या पायांवर जाण्यासाठी इतका वेडा होतो की, यामुळे त्याचा खेळ सोपा होतो आणि गोलंदाजांना अधिक अडचणी निर्माण होतात. परंतू विराटने विचारपुर्वक खेळायला हवे, असा सल्ला मांजरेकर देतात.
Advertisement

Leave a Reply