Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

टोक्यो पॅरॉलिंपिकमधील भारताचे पदक हिसकावले, वाचा काय आहे कारण..

सोमवारी देशाची निराशा करणारी बातमी टोक्योमधून आली आणि भारताच्या पदतालिकेतून एक पदक हिसकावण्यात आल्याने भारताची पदकसंख्या एकने घसरली. 

दिल्ली : कोणत्याही प्रकारचा खेळ असेल तर त्यात पदक जिंकण्यासाठी खेळाडू धडपडत करत असतात. मात्र ते पदक जर ऑलिंपिक किंवा पॅरॉलिंपिक मध्ये असेल तर अनेक खेळाडू जीव तोडून प्रयत्न करत असतात.  संपुर्ण देशाचं लक्ष त्या खेळाडूंच्या खेळाकडे लागलेले असते. त्यातच खेळाडून  पदक जिंकले तर संपुर्ण देश त्यांना खांद्यावर घेतो. मात्र एखाद्या खेळाडून पदक जिंकल्यानंतर ते पदक त्यांच्याकडून हिसकावले गेले तर संपुर्ण देश हळहळल्याशिवाय राहत नाही.

Advertisement

टोक्यो पॅरॉलिंपिक स्पर्धेत

Loading...
Advertisement

टोक्योमधून भारताला सातत्याने चांगली बातमी मिळत आहे. भारतीय खेळाडू एकामागे एक पदके जिंकत आहेत. मात्र या सगळ्यामध्ये सोमवारी देशाची निराशा करणारी बातमी टोक्योमधून आली आणि भारताच्या पदतालिकेतून एक पदक हिसकावण्यात आल्याने भारताची पदकसंख्या एकने घसरली.

Advertisement

भारतीय अॅथलिट असलेला थाळीफेकपटू विनोद कुमारचे कांस्यपदक अवैध ठरवण्यात आले आहे. तर त्यासाठी डिसॉर्डर वर्गीकरणाचे कारण देण्यात आले आहे. विनोद कुमारने रविवारी F-52 क्रीडाप्रकारात पुरूषांच्या थाळीफेकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.  परंतु काही देशांनी विरोध केल्यानंतर निकालास स्थगिती देण्यात आली. या घटनेने देशाच्या पदतालिकेतील एक पदक कमी झाल्याने भारताच्या पदरी निराशा पडली.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply