पुणे : प्रदूषण ही समस्या नसून विकासाच्या प्रक्रियेला ब्रेक लावण्याची आभासी कल्पना असल्याचे सध्या अनेकांना वाटते. विकासाच्या नावाखाली एकूण जैवविविधता धोक्यात आणण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्याला विरोध करणाऱ्याला सामाजिक किंवा पर्यावरण विरोधी म्हटले जाते. असाच प्रकार आता आपल्या पुढील पिढीवर म्हणजे मुलांवर मोठे संकट आणणारा ठरणार आहे.
जगातील सुमारे 100 कोटी मुलांना हवामान बदल आणि प्रदूषणाच्या परिणामांचा धोका आहे. युनिसेफच्या अहवालानुसार, भारतासह 33 देशांच्या मुलांचे आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षा धोक्यात आहे. हवामान बदल आणि प्रदूषणामुळे जगभरातील मुले हवामान बदलाच्या काही परिणामांशी झगडत आहेत. त्याचवेळी भारत, नायजेरिया, फिलिपिन्स आणि आफ्रिका यासह 33 देशांतील मुलांना एकाच वेळी तीन किंवा चार प्रभावांना सामोरे जावे लागत आहे. या प्रभावांमध्ये उष्णतेच्या लाटा, पूर, चक्रीवादळ, रोग, दुष्काळ आणि वायू प्रदूषण यांचा समावेश आहे.
युनिसेफने या परिस्थितीचे भयानक असे वर्णन केले आहे. हा अहवाल हवामान बदल, प्रदूषण, दारिद्र्य, मुलांसाठी स्वच्छ पाण्याची उपलब्धता, आरोग्य आणि शिक्षणाची उपलब्धता याचा परिणाम लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. अहवालाच्या लेखकांपैकी एक निक रीस यांनी लक्ष वेधले की, जगातील हवामान बदलामुळे मुलांना कुठे आणि कसे फटका बसत आहे याची चित्रे अकल्पनीयपणे भयानक आहेत. या सर्वांना वेळीच हाताळण्याची गरज आहे. हवामान संकटाचे परिणाम ‘अत्यंत असामान्य’ असल्याचे अहवालात म्हटले आहे. येत्या काही दिवसांत ते आणखी खराब होण्याची शक्यता आहे.
रीसच्या मते, जगातील टॉप 10 देश जे सर्वाधिक धोक्यात आहेत ते जागतिक उत्सर्जनाच्या केवळ 0.5% आहेत. या अहवालात असे आढळून आले आहे की 92 कोटी मुले पाण्याच्या टंचाईने ग्रस्त आहेत, 82 कोटी उष्णतेची लाट आणि 600 दशलक्ष मुले मलेरिया आणि डेंग्यू तापासारख्या वेक्टर-जनित रोगांना बळी पडत आहेत. युनिसेफच्या अहवालानुसार, जगातील सुमारे 300 दशलक्ष मुले उच्च वायू प्रदूषण असलेल्या भागात राहतात.
अदानी ग्रुपला मोठाच झटका; पहा सेबीने नेमका कशाला दाखवला लाल झेंडा..! https://t.co/2mfE5jVuHM
Advertisement— Krushirang (@krushirang) August 21, 2021
Advertisement