दिल्ली : कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर सप्टेंबरपर्यंत प्रत्येक देशात किमान १० टक्के तरी लसीकरण झाले पाहिजे, असे आवाहन डब्ल्यूएचओने केले आहे. जोपर्यंत जगातील प्रत्येक ठिकाणी महामारी नष्ट होणार नाही तोपर्यंत या महामारीचा पूर्णपणे नायनाट होणार नाही. जगात काही देश लसीकरणात खूप पुढे गेले आहेत तर काही देशात अजूनही कोरोना प्रतिबंधक लस मिळालेल्या नाहीत. त्यामुळे करोनाचे संकट कायम असतानाच अमेरिकेत आणखी एक नवीन विषाणू संकट आलेले आहे.
अमेरिकेत कोरोनाचे थैमान सुरू असतानाच आता आणखी एक नव्या विषाणूने एन्ट्री घेतली आहे. हा विषाणू सुद्धा आधिक संक्रामक असून लहान मुले व वयोवृद्ध नागरिक या विषाणूच्या विळख्यात सापडत आहेत. ‘रेस्पिरेटरी सीनसिटीयल वायरस’ असे या विषाणूचे नाव आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार या विषाणूचे रुग्ण जून महिन्यापासून सापडत आहेत. या आजाराची लक्षणे सर्दी, खोकला, शिंक येणे आणि ताप अशी आहेत. ह्युस्टन येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. हीथर हक यांनी सांगितले, की रुग्णालयात आरएसवी आणि कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. लहान मुलांमध्ये सुद्धा कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. यामागे डेल्टा व्हेरिएंट आहे. या नव्या व्हेरिएंटमुळे देशात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत चालले आहेत. मागील दोन दिवसांपूर्वी तर देशात एकाच दिवसात तब्बल 1 लाख नवे रुग्ण आढळले होते.
- म्हणून कोल्हापूर, सातारा, सांगलीला पुराचा वेढा; पहा प्रशासनाने नेमका काय केलाय बट्ट्याबोळ..!
- फेसबूक बंद करणार लहान मुलांचे अकाऊंट..! पाहा कशामुळे घेतलाय हा निर्णय..?