सुधारा रे.. सुधारा.. पहा फ़क़्त मुंबई-नागपूरच नाही जपान-युरोपही कोणत्या संकटात अडकलेत..!
मुंबई : सध्या नागपूर आणि तुंबई (सॉरी मुंबई) या महाराष्ट्राच्या दोन बड्या शहरात पावसाने घातलेला धिंगाणा अनेकांच्या काळजाचा ठेका चुकवून गेला आहे. त्यावर राजकारणी आपलीच लाल करून घेण्यात आत्ममग्न आहेत. मात्र, आपण जबाबदार नागरिकांना आता अवघ्या जगाची काळजी असल्याचे भान ठेऊन काम करावे लागणार आहे. कारण, जगभरात अनेक ठिकाणी पाण्याच्या पावसाचे संकट लाखो लोकांच्या जीवासाठी घातक बनत आहे.
कोरोना पाठोपाठ जगात अनेक संकटे येत आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि कॅनडात कडाक्याचा उन्हाळ्याने नागरिकांना हैराण केले. अनेकांच्या त्यात जीव गेले. तर, जपानला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला होता. त्यानंतर आता युरोपातील काही देशांना पाण्याच्या संकाटाचा सामना करावा लागत आहे. दक्षिण आणि पश्चिम जर्मनीत महापूर आला असून यामध्ये जवळपास 70 लोक बेपत्ता झाले आहेत. काही इमारती सुद्धा कोसळल्या आहेत. इतकेच नाही तर येथे 40 लोकांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. बेल्जियम, लेक्झेंम्बर्गमध्ये सुद्धा असेच संकट आहे.
सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार, जर्मनीत सध्या मुसळधार पाऊस होत आहे. गेल्या शंभर वर्षात इतका जबरदस्त पाऊस कधीच पडला नाही. काही भागात दुपटीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळे महापूर आला आहे, या पाण्यात मोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. जर्मनीच्या नॉर्थ राइन वेस्टफेलियासह अन्य काही प्रांतांत मोठे नुकसान झाले आहे. महापूर आणि भुस्खलामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे कोठे किती नुकसान झाले आहे, याची निश्चित माहिती मिळण्यात अडचणी येत आहेत.
दरम्यान, कोरोनाने निर्माण केलेली आर्थिक संकटे, देशांतील वाद आणि जलवायू परिवर्तन यामुळे जगातील जवळपास 5 लाख 20 हजार लोकांना उपासमारीच्या उंबरठ्यावर आणले आहे. कोरोनासारख्या जागतिक संकटाचा सामना करण्याऐवजी एकमेकांना त्रास देण्याचे उद्योग सध्या सुरू आहेत. याचा फटका आधीच संकटग्रस्त असणाऱ्या लाखो लोकांना बसत आहे.
जगात कोरोनाचे संकट निर्माण झालेले असतानाही देशांनी आपल्या सैन्यावरील खर्च आजिबात कमी केलेला नाही. महामारीच्या काळात तर हा खर्च 51 अब्ज डॉलर्सने वाढला आहे. उपासमारीचे संकट मिटवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना आज जितक्या पैशांची गरज आहे त्यापेक्षा देशांच्या संरक्षण सिद्धतेवर खर्च होणारी ही रक्कम सहा पटींनी जास्त असल्याचे या अहवालात म्हटले आहे. अफगाणिस्तान, इथिओपिया, दक्षिण सुदान, येमेन आणि सीरिया या देशांना आज सर्वाधिक उपासमार सहन करावी लागत आहे.
बदलला की मार्केट ट्रेंड; पहा काय चालूये सोन्याच्या बाजारात, आज झाली ‘इतकी’ वाढ..!