Take a fresh look at your lifestyle.

भयंकरच की.. ‘त्यामुळे’ आहे तब्बल १०० कोटी जनतेला धोका; भारतासह शेजारील देशही प्रभावित

दिल्ली : सध्याच्या करोना संकटापुढे अवघे जग हतबल झालेले आहे. अशावेळी नवीन विषाणू आणि रोग डोके वरती काढत आहेत. अशातच आता पर्यावरणीय असमतोलामुळे जगाची डोकेदुखी वाढत आहे. कॅनडासारख्या देशातील तापमान वाढल्याने शेकडो जीव गेले आहेत. तसाच भयंकर प्रकार भारतीय उपखंडात होऊ शकतो असे संशोधकांना वाटत आहे.

Advertisement

भारत व नेपाळ या दोन देशांतील संशोधकांनी याबाबत अहवाल दिला आहे. इंदूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे संशोधनाचे प्रमुख लेखक आणि सहायक प्राध्यापक फारूक आझम हेही अभ्यासकांच्या टीममध्ये होते. त्यांनी म्हटले आहे की, नदीचा प्रवाह बदलल्याने सिंचनासाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता आणि प्रमाणावर परिणाम होऊ शकतो. हिमालयातील हिमनग आधी जूनमध्ये वितळायचे, मात्र आता ते एप्रिल महिन्यामध्येच वितळतात. परिणामी उपजीविका आणि अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम दिसत आहेत.

Advertisement

हिमालय आणि काराकोरम डाेंगरांवर तापमान वाढल्याने बदलाचा परिणाम दिल्ली, लाहोर, कराची, कोलकाता आणि ढाका शहरांवर होणार आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर हरियाणा, राजस्थानचा सिंधू नदीच्या खोऱ्यातील भाग आणि गंगा खोऱ्यातील उत्तराखंड, दिल्ली, दक्षिण हरियाणा, यूपी, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्यप्रदेश, यासह ब्रह्मपुत्रा खोऱ्यातील सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि बहुतांश आसाम, मेघालय, नागालँड या सर्वच भागाला याचा मग मोठा फटका बसेल.

Advertisement

आताच हिमनग वितळल्याने नद्या दुथडी भरून वाहून सखल भागात पूरस्थिती निर्माण होत आहे. शेती, उपजीविकेचे इतर साधने आणि जलविद्युत क्षेत्रावरही याचा प्रभाव दिसेल. हिमालय-काराकोरम भागात नदींची पाणीपातळी बर्फ किंवा हिमनग वितळणे, पाऊस आणि भूजलाने प्रभावित होऊन असे परिणाम दिसतील. २०५० पर्यंत विविध हंगामात हिमनग वितळल्याने नदीत जलप्रवाह यावर परिणाम होऊन भारत आणि शेजारील देशातील सुमारे १०० कोटींची लोकसंख्या यामुळे बाधित होईल, असे संशोधकांना वाटत आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply