Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ब्रिटेनसह तीस देशांत फैलावातोय नवाच करोना; पहा डेल्टापेक्षा किती विध्वंसक आहे हा व्हेरिएंट

दिल्ली : कोरोनाने आता स्वतःचे रुप बदलत आधिक घातक होण्यास सुरुवात केली आहे. या नव्या रुपात येत कोरोनाने पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. डेल्टा, डेल्टा प्लस नंतर आता आणखी एक व्हेरिएंट थैमान घालत आहे. कोरोनाच्या Lambada या व्हेरिएंटने आतापर्यंत जगातील ३० देशांना विळख्यात घेतले आहे. हा व्हेरिएंट डेल्टापेक्षाही आधिक विध्वंसक होऊ शकतो, अशी भीती तज्ज्ञांना वाटत आहे.

Advertisement

कोरोनाचा हा व्हेरिएंट सर्वात आधी पेरू या देशात सापडला होता. त्यानंतर आता हा व्हेरिएंट ब्रिटेनसह तीस देशांत फैलावला आहे. या देशात आतापर्यंत या व्हेरिएंटचे सहा रुग्ण सापडले आहेत. हा व्हेरिएंट डेल्टापेक्षाही जास्त संक्रामक असल्याने संशोधकांचे टेन्शन वाढले आहे. पहिला रुग्ण पेरूमध्ये आढळला होता. या व्हेरिएंटला C.37 या नावाने ओळखले जाते. युरो न्यूजने पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायजेशनच्या हवाल्याने सांगितले, की पेरूमध्ये मे आणि जून महिन्यात कोरोना रुग्णांचे नमुने घेण्यात आले होते. यापैकी जवळपास ८२ टक्के नमुन्यांमध्ये हा नवा व्हेरिएंट आढळला होता. विशेष म्हणजे, या व्हेरिएंटमध्ये असामान्य म्युटेशन झाल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे हा कोरोनाचा नवा अवतार आधिक घातक सिद्ध होण्याची भिती शास्त्रज्ञांना वाटत आहे.

Advertisement

दरम्यान, डेल्टा व्हेरिएंटने सुद्धा जगभरात धुमाकूळ घातला आहे. डेल्टासारखे व्हेरिएंट आधिक संक्रामक असून बऱ्याच देशांमध्ये पसरत आहे. अद्याप कोणताही देश या संकटातून बाहेर आलेला नाही. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आधिक धोकादायक आहे, आणि काळानुसार तो आणखी बदलत आहे. त्यामुळे आपणास सतत देखरेख ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. आजमितीस जगातील ९८ पेक्षा जास्त देशांमध्ये हा व्हेरिएंट पसरला आहे. लसीकरण वेगाने न केल्यास यामुळे अवघे जग संकटात सापडू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. याआधी आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस यांनी सांगितले होते, की आतापर्यंत कोरोनाच्या जितक्या व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे, त्यामध्ये डेल्टा व्हेरिएंट सर्वाधिक संक्रामक आहे. कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या लोकांमध्ये हा व्हेरिएंट वेगाने फैलावत चालला आहे.

Loading...
Advertisement

कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर सप्टेंबरपर्यंत प्रत्येक देशात किमान १० टक्के तरी लसीकरण झाले पाहिजे, असे आवाहन डब्ल्यूएचओने केले आहे. जोपर्यंत जगातील प्रत्येक ठिकाणी महामारी नष्ट होणार नाही तोपर्यंत या महामारीचा पूर्णपणे नायनाट होणार नाही. जगात काही देश लसीकरणात खूप पुढे गेले आहेत तर काही देशात अजूनही कोरोना प्रतिबंधक लस मिळालेल्या नाहीत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply