Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पंतप्रधान मोदींचे पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या नेत्यांच्या यादीत नाव.. पाहा कोणा-कोणाच्या नावाचा समावेश आहे..?

नवी दिल्ली : पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या विविध देशातील ३७ नेत्यांची यादी फ्रेंचमधील ‘प्रेस वॉचडॉग- रिपोर्टर्स विदाउट बाउंड्रीज (RSF) या वेबसाईटने जाहीर केली आहे. या यादीत पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान, उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्यासह आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही नावाचा समावेश केला आहे.

Advertisement

आरसीएफ संकेतस्थळावर म्हटले आहे, की पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात सैन्याचा प्रभाव दिसतो. इम्रान खान यांच्या काळात कधीही सेंन्सरशिप लावली जाते, वृत्तपत्र छपाईत अडथळे आणले जातात, माध्यम संस्थांना धमकावले जाते, टीव्ही चॅनल्सचे सिग्नल जाम केले जातात. इम्रान खान पंतप्रधान झाल्यापासून या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

Advertisement

सौदी अरबचे क्राउन प्रिंस बिन सलमान यांच्या शासनाला तर अत्याचारी म्हटले आहे. गुप्तहेरी, धमकाविणे, अपहरण आणि अत्याचार, असे प्रकार वाढले असल्याचे आरसीएफने म्हटले आहे.

Advertisement

हॉन्गकॉन्गच्या अॅडमिनिस्ट्रेटिव चीफ कॅरी लॅम या महिला नेत्याचेही नाव या यादीत आहे. देशात 2018 मध्ये आणलेल्या डिजिटल सिक्योरिटी कायद्याला या वेबसाईटने अत्याचारी असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

यादीतील नेत्यांची नावे
अब्देल फतह अल सिस्सी (इजिप्त), अलेंक्जांडर लूकाशेंको (बेलारूस), अली खमेनेई (इराण), बशर अल-असद (सीरिया), कैरी लैम (हॉन्गकॉन्ग), डेनियल ऑर्टेगा (निकारागुआ), इमोमली रखमॉन (ताजिकिस्तान), गोताबाया राजपक्षा (श्रीलंका)

Loading...
Advertisement

गुरबंगुली बर्डीमॉखम्मेदोव (तुर्कमेनिस्तान), हामिद बिन इसा अल खलीफा (बहरीन), हुन सेन (कंबोडिया), इलहम अलिएव (अजरबैजान), इम्रान खान (पाकिस्तान), इस्माइल ओमर गुएल्लेह (दजिबाउती), इस्सायस अफवर्की (इरिट्रिया), जायर बोलसोनारो (ब्राझील).

Advertisement

किम जोंग उन (उत्तर कोरिया), ली सिएन लूंग, (सिंगापूर), मिगुएल डायज-कनेल (क्यूबा), मिन ऑन्ग लायंग (म्यानमार), मोहम्मद बिन सलमान (सौदी अरब), नरेंद्र मोदी (भारत), एनगुएन फु ट्रोंग (व्हिएतनाम), निकोलस मदुरो (वेनेजुला), पॉल बिया (कॅमरून)

Advertisement

पॉल कगामे (रवांडा), प्रायुत चान-ओ-चा (थायलंड), रेसेप तैइप एर्डोगन (तुर्की), रॉड्रिगो दुर्तेते (फिलिपाईन्स), सल्वा कीर (दक्षिण सूदान), शेख हसीना (बांग्लादेश), तेइयोडोरो गुएमा एमबासोगो (इक्वाटोरियल गुनिया), विक्टर ऑर्बन (हंगेरी), व्लादिमीर पुतिन (रशिया), शी जिनपिंग (चीन), योवेरी मुसेवेनी (यूगांडा).

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेटशेती-मातीच्या बातम्यालेखमाहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलोसबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply