Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

चीनच्या ‘त्या’ निर्णयाचा भारताला बसणार झटका; पहा नेमका काय घोटाळा करणार आहे मुजोर शेजारी

दिल्ली : अमेरिकेने अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याची घोषणा केल्यानंतर आता अमेरिकन सैन्याने या देशातून बऱ्यापैकी माघार घेतली आहे. अमेरिकेच्या या कार्यवाही नंतर मात्र जागतिक राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला असून यामध्ये त्यास यशही येत आहे. दुसरीकडे मात्र भारताच्या डोकेदुखीत वाढ करणाऱ्या घटना घडू लागल्या आहेत.

Advertisement

अमेरिकेने माघार घेतल्यानंतर चीन सक्रीय झाला आहे. या देशास कर्जाच्या जाळ्यात अडकवून ताबा मिळवण्याचे प्रयत्म ड्रॅगनने आधिक वेगाने सुरू केले आहेत. चीनने या देशात प्रवेश शिरकाव केला तर भारताचे टेन्शन मात्र वाढणार आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरच्या (सीपीइसी) माध्यमातून चीन अफगाणिस्तानात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. या प्रकल्पाचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. अफगाणितस्तान सरकारचे अधिकारी सुद्धा याबाबत विचार करत आहेत. कारण, या युद्धग्रस्त देशास सध्या अन्य देशांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. त्यामुळे चीन या प्रकल्पाच्या माध्यमातून देशात अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करणार असेल तर फायद्याचेच ठरणार आहे.

Advertisement

सध्या चीन रस्ते, रेल्वे आणि ऊर्जा प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज देत आहे. चीनच्या या कर्जाच्या जाळ्यात अनेक देश अडकले आहेत. बीआरआय प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. या प्रकल्पांतर्गत पाकिस्तानातील पेशावर ते अफगाणिस्तानची राजधानी काबूलपर्यंत महामार्ग बांधण्याचा चीनचा प्रयत्न आहे. यासाठी सध्या दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांत चर्चा सुरू आहे. या प्रयत्नात चीनला यश मिळाले तर अफगाणिस्तान सुद्धा या प्रकल्पात सहभागी होईल. आतापर्यंत अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे चीनचे मनसूबे सफल होत नव्हते. आता मात्र तशी परिस्थिती नाही. अफगाणिस्तान जर या प्रकल्पात सहभागी झाला तर भारताचे टेन्शन निश्चितच वाढणार आहे. पश्चिम आशिया, मध्य आशिया आणि युरोपपर्यंत पकड मजबूत करण्यास चीनला याचा फायदा होणार आहे.

Loading...
Advertisement

असे झाले तर भारतास नुकसान सहन करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. किंवा तत्काळ पावले उचलत चीनचा हस्तक्षेप रोखण्यासाठी रणनिती तयार करावी लागणार आहे. कारण, भारताने सुद्धा या देशात मोठी गुंतवणूक केली आहे. रस्ते, ऊर्जा प्रकल्प, धरण बांधकाम भारताच्या मदतीनेच होत आहे. तसेच अन्य क्षेत्रातही भारत मदत करत आहे. अशा परिस्थितीत चीनची एन्ट्री भारतासाठी त्रासदायक ठरणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply