Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

जम्मू-काश्मीरचा आहे ‘त्यामध्ये’ पैला नंबर; पहा महाराष्ट्र, दिल्ली, गुजरातलाही कशात टाकलेय मागे..!

दिल्ली : सततच्या दहशतवादाने ग्रस्त असणारे जम्मू काश्मीर राज्याने एका बाबतीत प्रथम क्रमांक मिळवला आहे. अगदी प्रगत आणि पुढारलेले असल्याचा दावा करणाऱ्या महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीसह दक्षिण भारतीय राज्यांनाही त्यांनी मागे टाकलेले आहे. त्यामुळे फ़क़्त बातम्यात दाखवले जाणाऱ्या ‘वास्तवा’च्या पल्याडही या दोन्ही राज्यांना समजून घेण्याची किती आवश्यकता आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

या राज्यातील जवळपास शंभर टक्के मुले आज इंग्लिश मेडियममध्ये शिक्षण घेत आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर तेलंगाणा राज्य आहे. या राज्यात ७३ टक्के मुले इंग्लिश मेडियम शाळांत शिक्षण घेत आहेत. तेलुगु मेडियममध्ये शिकणाऱ्या मुलांची संख्या २३.७ टक्के इतकी आहे. या यादीत केरळ ६४.५ टक्क्यांसह तिसऱ्या, आंध्र प्रदेश (६३ टक्के) चौथ्या तर दिल्ली ५९ टक्क्यांसह पाचव्या क्रमांकावर आहे. आजमितीस देशातील २६ टक्के मुले इंग्लिश माध्यमाच्या शाळांत शिक्षण घेत आहेत. हरयाणा राज्याने यात बाजी मारली आहे. या राज्यात अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजेच २३ टक्के वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत ५९ टक्के पालकांनी आपल्या मुलांना इंग्लिश माध्यमाच्या शाळांत दाखल केले आहे.

Advertisement

भारतासारख्या हजारो भाषांचे घर असणाऱ्या देशात इंग्लिश भाषेचा दबदबा चांगलाच वाढला आहे. खासगी क्षेत्रात तर आता इंग्रजीला पर्याय राहिलेला नाही. सरकारी कामकाजातही इंग्रजी भाषेला प्राधान्य आहे. मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीनेही पालक वर्गाकडून आज इंग्रजी भाषेचाच विचार केला जात आहे. त्यामुळेच तर आज इंग्रजी शाळांत अॅडमिशन वाढल्या आहेत. मागील वर्षभराच्या काळात इंग्लिश मेडीयम शाळांत शिकणाऱ्या मुलांची संख्या वेगाने वाढल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

Loading...
Advertisement

हरयाणा राज्यात इंग्रजी भाषेचा एक वेगळाच दबदबा आहे. एकेकाळी राज्यातील लोक इंग्रजी भाषा नकोच म्हणत होते. आता मात्र परिस्थिती फार बदलली आहे. सन २०१४-१५ मध्ये राज्यातील २७ टक्के मुले इंग्रजी शाळांत शिकत होते. आता यामध्ये वाढ होऊन आज ५०.८ टक्के मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. हरयाणा नंतर तेलंगाणा राज्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळात शिकणाऱ्या मुलांची संख्या वेगाने वाढली आहे. या राज्यात ७३.८ टक्के मुले इंग्लिश मेडियम शाळांत शिक्षण आहेत.

Advertisement

विशेष म्हणजे देशात आज अनेक राज्यात हिंदी भाषा बोलली जाते. हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून आज हिंदी भाषा जगभरात पोहोचली आहे. त्यामुळेच या भारतीय भाषेबाबत जगभरात एक वेगळीच क्रेझ पाहण्यास मिळते. भारतात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढत असली तरी हिंदी माध्यमाच्या शाळांची संख्या सुद्धा कमी नाही. देशभरात ४२ टक्के मुले हिंदी माध्यमाद्वारे शिक्षण घेत आहेत. त्यानंतर इंग्लिश दुसऱ्या, बंगाली तृतीय आणि मराठी चौथ्या क्रमांकावर आहे. देशात ६.७ टक्के मुले बंगाली माध्यमाद्वारे तर ५.६ टक्के मुले मराठी माध्यमाद्वारे शिक्षण घेत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply