Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘डेल्टामय जग.. काळजी हाच धर्म..!’; पहा कुठे-कुठे पोहोचलाय नवा घातक करोना विषाणू..!

दिल्ली : कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर सप्टेंबरपर्यंत प्रत्येक देशात किमान १० टक्के तरी लसीकरण झाले पाहिजे, असे आवाहन डब्ल्यूएचओने केले आहे. जोपर्यंत जगातील प्रत्येक ठिकाणी महामारी नष्ट होणार नाही तोपर्यंत या महामारीचा पूर्णपणे नायनाट होणार नाही. जगात काही देश लसीकरणात खूप पुढे गेले आहेत तर काही देशात अजूनही कोरोना प्रतिबंधक लस मिळालेल्या नाहीत. भारतातही अशीच भीषण परिस्थिती आहे. अशावेळी डेल्टा व्हेरिएंट जगभर पसरत असल्याने डोकेदुखी वाढत आहे.

Advertisement

Advertisement

कोरोनाचा अतिशय घातक असा डेल्टा व्हेरिएंट आत जगभरात फैलावला आहे. जगभरात या नव्या व्हेरिएंटने संक्रमित रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असल्याने जगाचे टेन्शन वाढले आहे. इस्त्रायल सारख्या जवळपास शंभर टक्के लसीकरण झालेल्या देशातही पुन्हा रुग्ण सापडले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगातील तब्बल ९६ देशात हा व्हेरिएंट फैलावला आहे. पुढील काही दिवसात हा व्हेरिएंट अवघ्या जगात फैलावेल असा इशाराही संघटनेने दिला आहे.

Loading...
Advertisement

बऱ्याच देशांनी हे मान्य केले आहे, की डेल्टा व्हेरिएंटमुळे संक्रमण पुन्हा वाढले आहे. रुग्णांचे दवाखान्यात भरती होण्याचे प्रमाण वाढले आहे. रायटर या न्यूज एजन्सीनुसार जागतिक आरोग्य संघटनेने युरोपमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. संघटनेचे हंस क्लूगे यांनी सांगितले, की मागील दहा आठवड्यांपासून युरोपमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होत होते. आता मात्र हा ट्रेंड लवकरच बदलणार आहे. जर लोकांनी आवश्यक खबरदारी घेतली नाही तर कोरोनाच्या आणखी एका लाटेस टाळता येणे अशक्य आहे.

Advertisement

याआधी आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस यांनी सांगितले होते, की आतापर्यंत कोरोनाच्या जितक्या व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे, त्यामध्ये डेल्टा व्हेरिएंट सर्वाधिक संक्रामक आहे. कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या लोकांमध्ये हा व्हेरिएंट वेगाने फैलावत चालला आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने काही देशांनी लॉकडाऊनचे निर्बंधांत सवलती दिल्या आहेत. त्यामुळे सुद्धा जगभरात कोरोना संक्रमण पुन्हा वाढत चालले आहे. सद्यस्थितीत अल्फा व्हेरिएंटची प्रकरणे १७२ देशात आढळली आहेत. तसेच गामा व्हेरिएंट ७२ आणि बीटा व्हेरिएंटची प्रकरणे १२० देशात आढळली आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply