दिल्ली : हवामान बदलाच्या संकटाचा आज अवघ्या जगास सामना करावा लागत आहे. कुठे भीषण दुष्काळ तर कुठे अगदीच कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. उन्हाळाही इतका कडाक्याचा की अक्षरशः लोकांचे प्राण गेले आहेत. होय, सध्या कॅनडा आणि अमेरिकेच्या काही प्रांतात लोक या कडाक्याच्या उन्हाळ्याने हैराण झाले आहेत.
कॅनडाच्या वैंकुवर शहरात तर १३० लोकांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंना कडाक्याचा उन्हाळा कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येत आहे. आजमितीस कॅनडाच्या काही प्रांतात तापमान ४९.५ डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. इतक्या भीषण उन्हाळ्याचा अनुभव इथल्या लोकांना सहसा नाही. त्यामुळे हा उन्हाळा त्यांना अगदीच असह्य होत आहे. दुपारच्या वेळी तर घराबाहेर पडणे सुद्धा कठीण झाले आहे.
मंगळवारी कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतात सलग तिसऱ्या दिवशी तापमान 49.5 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आले. उत्तर पश्चिम अमेरिका आणि कॅनडात अधिक दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने या देशात सध्या उष्णतेच्या लाटा येत आहेत. वैंकुवर शहरात 65 लोकांच्या मृत्यूमागे भीषण उष्णता हे एक कारण आहे, असे पोलिसांनी सांगितले. येथील बुर्णबे शहरात जवळपास 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. याआधी वैंकुवर शहरात असा कडाक्याचा उन्हाळा कधीच पडला नव्हता. त्यामुळे येथील नागरिकांसाठी हा अनुभव नवीन आहे. हा उन्हाळा असह्य झाल्याने काही जणांचा मृत्यू झाला आहे. आता तर अशी परिस्थिती आहे की लोकांना घराबाहेर पडणे सुद्धा कठीण झाले आहे. अमेरिकेत सुद्धा अशीच परिस्थिती आहे. येथील काही प्रांतात 44 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात येत आहे.
दरम्यान, भारतात सुद्धा काही शहरात कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. विशेष म्हणजे, देशात मान्सूनचे आगमन झाले आहे. मात्र काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परिणामी, उत्तर भारतातील अनेक राज्यात तापमान वाढले आहे. मंगळवारी राजधानी दिल्लीत दिवसभर कडाक्याचे ऊन पडले होते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.