Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अखेर कुरापती नडल्याच; पाकिस्तान आलाय घायकुतीला, पहा काय झालीय दुर्दशा..!

Please wait..

दिल्ली : भारत सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये काश्मीरमधील कलम 370 रद्द केले. तेव्हापासून दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांतील व्यापार बंद पडला आहे. भारतास फारसा फरक पडलेला नाही. पण, पाकिस्तान मात्र चांगलाच अडचणीत सापडला आहे. पाकिस्तानला आवश्यक असणाऱ्या एकूण औषधांपैकी 40 टक्के औषधे भारतातून पुरवठा होतात. पण, आता पुरवठा बंद पडल्याने 2 रुपयांच्या औषधासाठी 20 रुपये द्यावे लागत आहेत. त्यामुळे पाकिस्तानातील औषध उत्पादकांनी पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेऊन त्यांना भारतातून मागवण्यात येणाऱ्या औषधांवरील बंदी मागे घेण्यात यावी, अशी मागणी केली होती

Advertisement

भारताचा कुरापतखोर शेजारी पाकिस्तानच्या अडचणी काही केल्या कमी होण्यास तयार नाहीत. कोरोनाने या देशाच्या अर्थव्यवस्थेस जबर फटका बसला आहे. बेरोजगारी वाढली आहे, गरीबीत वाढ झाली आहे. आता तर महागाई सुद्धा रोज नवे रेकॉर्ड करत आहे. देशातील महागाईचा दर 12 टक्क्यांवर पोहोचला आहे. ढासळत चाललेल्या अर्थव्यस्थेस आधार देण्यासाठी कर्ज घ्यावे लागत आहे. आता पुन्हा संकटग्रस्त पाकिस्तानने कर्ज मिळवण्यात यश प्राप्त केले आहे. होय, जागतिक बँक पाकिस्तानला तब्बल 80 कोटी अमेरिकी डॉलर कर्ज देणार आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

बँकेने स्वच्छ ऊर्जा आणि मानव विकासाच्या विविध योजनांसाठी हे कर्ज देऊ केले आहे. एक्सप्रे ट्रिब्यून वृत्तपत्रानुसार या कर्जाच्या रकमेचा उपयोग अपूर्ण असणाऱ्या विविध विकास योजनांसाठी केला जाणार आहे. तसेही पाकिस्तानला सध्या कर्जाचाच आधार आहे. अर्थव्यवस्था तर आधीच डबघाईस आली आहे. बेरोजगारी वाढली आहे. गरीबीत सुद्धा वाढ झाली आहे. महागाई तर रोजच नवीन रेकॉर्ड करत आहे. मग, या संकटातून बाहेर पडण्यासाठी कर्ज घेण्याशिवाय दुसरा पर्याय या देशासमोर नाही. आधीच कर्जाचा डोंगर झाला आहे. एक कर्ज मिटवण्यासाठी दुसरे कर्ज घ्यावे लागत आहे, अशी सध्याची परिस्थिती आहे. यासाठीच देशाचे राज्यकर्ते दुसऱ्या देशांचे दौरे करत असतात. दुसरीकडे, देशातील समस्या वाढतच चालल्या आहेत. महागाई तर इतकी वाढली आहे, की फक्त एक किलो साखरेसाठी नागरिकांना तब्बल 110 रुपये मोजावे लागत आहेत, तर एक किलो गव्हाच्या पिठासाठी 96 रुपये द्यावे लागत आहे. या वाढत्या महागाईने देशातील लोक हैराण झाले आहेत.

Advertisement

देशात ऑगस्ट 2019 पासून महागाई सातत्याने वाढत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता व्यापार जवळपास बंदच आहे, त्यामुळे या देशात आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण, अनेक जीवनावश्यक वस्तू भारताकडूनच खरेदी कराव्या लागत होत्या आता मात्र व्यापार बंद असल्याने या वस्तूंचा पुरवठा होत नाही. त्यामुळे पाकिस्तानला अन्य देशांकडून जादा दराने या वस्तू विकत घ्याव्या लागत आहेत..

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply