Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सोने शोधायला गेले आणि सापडली ‘ती’ सोन्यासारखी गोष्ट; पहा कुठे घडले आश्चर्य

दिल्ली : जगात कधी काय घडेल काहीच सांगता येत नाही. आपण स्वप्नात सुद्धा विचार करू शकणार नाही अशा अद्भुत घटना प्रत्यक्षात घडल्या आहेत. आता सुद्धा कॅनडा या देशात अशीच एक चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. सोने कोठे आहे याचा शोध घेण्यासाठी गेलेल्या काही जणांना युकोन प्रांतात सोने तर मिळाले नाहीच त्याऐवजी तब्बल 29 हजार वर्षे जुना हत्तीसारख्या दिसणाऱ्या विशालकाय प्राण्यांच्या हाडांचे सापळे मिळाले आहे.

Advertisement

Advertisement

येथील स्थानिक वर्तमानपत्र द व्हाइटहॉर्सने याबाबत बातमी दिली आहे. त्यात असे म्हंटले आहे, की कॅनडातील युकोन प्रांतात सोने शोधणाऱ्या एका पथकास मैमथ या प्राण्यांचे सापळे मिळाले आहेत. युकोन सरकारचे प्रमुख जीवाश्म तज्ज्ञ ग्रँट जजुला यांनी सांगितले, की या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात मैमथ प्राण्यांचे सापळे मिळणे ही एक अतिशय दुर्लभ घटना आहे. यामुळे काही प्रश्न निर्माण झाले असून त्याचे उत्तर शोधणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने हाडांचे सापळे मिळाले आहेत, त्यावरुन असे समजते की हे प्राणी एकच परिवार किंवा प्राणी समूहाचे सदस्य असावेत. या प्राण्यांचा मृत्यू साधारण 29 हजार वर्षांपूर्वी झाला असावा. ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या पर्वतांच्या परिसरात हे सापळे मिळून आले आहेत.

Loading...
Advertisement

Advertisement

हिमयुगाच्या काळात हे विशालकाय प्राणी उत्तर अमेरिका आणि युरेशिया याठिकाणी फिरत होते. हे जीव जवळपास 10 हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवरून गायब झाले. असे काय घडले की हे प्राणी अचानक गायब झाले याचे उत्तर वैज्ञानिकांना अजुनही सापडलेले नाही. जागतिक हवामान बदल आणि माणसांनी केलेल्या शिकारींमुळे हे प्राणी नाहीसे झाले असावेत असे काही जणांचे म्हणणे आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply