Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तानच्या संकटात भर; पहा कोणत्या अडचणीपुढे देश झालाय हतबल..!

दिल्ली : दहशतवादास खतपाणी घालणारा पाकिस्तान त्याच्या कृत्यांनी जगात आधीच बदनाम झाला आहे. त्यात आता या देशातील नागरिक सुद्धा तसेच उपजले आहेत. विदेशात राहणाऱ्या या पाकिस्तानी लोकांच्या कारवायांनी ते देशही हैराण झाले असून त्यांनी अशा कुरापतखोर पाकिस्तान्यांना आपल्या देशातून हाकलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षांत अनेक देशांनी अवैध घुसखोरी, कागदपत्रांत हेराफेरी आणि वर्क परमिटची मुदत संपल्यानंतरही आपल्या देशात न परतणाऱ्या पाकिस्तानी लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. सन २०१५ पासून प्रत्येक दिवशी सरासरी २८३ पाकिस्तानी लोकांना त्यांच्या देशात पाठवण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement

एका अहवालानुसार सन २०१५ पासून आतापर्यंत १३८ देशांनी ६,१८,८७७ पाकिस्तानी लोकांना परत पाठवले आहे. विविध आरोप असल्याने या लोकांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवण्यात आले आहे. यासाठी विदेशातील पाकिस्तानी दूतावासांना अपयशी ठरवण्यात येत आहे. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) म्हटले आहे, की विदेशातील पाकिस्तानी संस्थांनी नागरिकांना योग्य ती मदत केली नाही. त्यामुळे आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Loading...
Advertisement

अहवालात असे सांगितले गेले आहे की ५२ टक्के लोकांना सौदी अरेबियातून परत पाठवण्यात आले आहे. गेल्या सहा वर्षांत सौदी अरेबियाने ३,२१५९० पाकिस्तानी लोकांना म्हणजेच दररोज सरासरी १७७ जणांना परत त्यांच्या देशाक रवाना केले आहे. २०१५ सऊदी अरेबियाने ६१,४०३ पाकिस्तानींना परत त्यांच्या मायदेशी रवाना केले. २०१६ मध्ये ५७,७०४, २०१७ मध्ये ९३,७३६, २०१८ मध्ये ५०,९४४, २०१९ मध्ये ३८,४७० आणि २०२० मध्ये १९,३३३ लोकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्याचप्रमाणे युएईने गेल्या सहा वर्षात ५३,६४९ पाकिस्तानी नागरिकांना देशातून बाहेर काढले. इराणनेही १,३६,९३० पाकिस्तानी लोकांना परत पाठवले आहे.

Advertisement

या व्यतिरिक्त ब्रिटन आणि अमेरिकेनेही बर्‍याच पाकिस्तानी नागरिकांना देशातून बाहेर काढले आहे. ब्रिटनने ८ हजार पाकिस्तानी परत पाठवले आहे तर अमेरिकेत ही संख्या १७०० आहे. पाकिस्तानचा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुर्की या देशानेही ३२ हजारांपेक्षा जास्त पाकिस्तानी लोकांना त्यांच्या देशात परत रवाना केले आहे. पाकिस्तानी लोकांना परत पाठविणार्‍या देशांच्या यादीत रशियाचा देखील समावेश आहे. येथून ४५६४ पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply