Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून इस्त्राईल पडला तोंडघशी; पहा आता कोणता निर्णय घ्यावा लागला त्यांना..!

दिल्ली : कोरोना आपल्या देशातून गेला, देश कोरोना मुक्त झाला, असा दावा निदान सध्याच्या परिस्थितीत तरी कुणीच करू नये. कारण, हा विषाणू असा काही घातक आहे की रुपे बदलून पुन्हा आधिक वेगाने आक्रमण करत आहे. इस्त्रायलच्या बाबतीतही असेच घडले आहे. या देशाने जवळपास सर्वच नागरिकांचे लसीकरण केले, त्यानंतर मास्कवरील निर्बंध हटवले, मास्कवरील निर्बंध हटवणारा पहिला देश असाही दावा ठोकल होता. मात्र, काहीच दिवसात कोरोनानी या दाव्यातील हवा काढून टाकली आहे. इस्त्रायलचा हा दावा अपयशी ठरल्याचे सिद्ध केले आहे.

Advertisement

होय, कारण या देशात आता कोरोनाच्या डेल्टा वेरिएंटचा प्रसार वाढत चालला आहे. त्यामुळे सरकार टेन्शनमध्ये आले असून सरकारने पुन्हा मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मागील दहा दिवसांपासून येथे कोरोना संक्रमण वाढत आहे, त्यामुळे सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे बंधनकारक केले आहे. याआधी देशाचे पंतप्रधान नफ्ताली यांनी सांगितले होते, की जर एक आठवड्यात दररोज १०० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्यास मास्क वापरणे बंधनकारक केले जाईल. देशात सध्या रुग्ण वेगाने वाढत आहेत. या देशाची लोकसंख्या एक कोटींच्या आसपास आहे. देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण झाल्याचे सरकारने सांगितले आहे. तरी देखील देशात कोरोनाच्या डेल्टा वेरिएंटचे संक्रमण वाढत आहे. त्यामुळे सरकारला पुन्हा कठोर निर्णय घेणे भाग पडले आहे.

Advertisement

Loading...
Advertisement

इस्त्रायलप्रमाणेच युरोपातील काही देश रशिया आणि चीनमध्येही रुग्ण वाढत आहे. डेल्टा वेरिएंटमुळे रुग्ण वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या देशात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात येत आहेत. भारतात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना काही राज्यात डेल्टा प्लस वेरिएंटची प्रकरणे समोर आली आहेत. हा वेरिएंट आधीच्या डेल्टा वेरिएंटपेक्षाही आधिक घातक असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना अलर्ट केले आहे. देशात तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कदाचित हाच डेल्टा प्लस वेरिएंट तिसऱ्या लाटेस कारणीभूत ठरू शकतो, अशी भिती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Advertisement

दरम्यान, देशात दुसऱ्या लाटेत हाहाकार उडाला होता. रुग्णवाढीचा वेग इतका जबरदस्त होता की एक दिवसात चार लाख रुग्ण सापडत होते. इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली. ऑक्सिजनचे मोठे संकट निर्माण झाले. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले. या काळात मृत्युदर सुद्धा वाढला होता, पॉझिटिव्हिटी रेट वाढला होता, अशी विदारक परिस्थिती या काळात होती. त्यामुळे तिसरी लाट आलीच तर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने नियोजन करण्यास सुरुवात केली. देशातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर दिला. ऑक्सिजन कमतरता दूर करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात आले. नवीन दवाखान्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. औषधे आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतील याचे नियोजन करण्यात आले, त्यामुळे आता तिसरी लाट आली तरी या लाटेचा सामना करण्यास तयार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply