Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

चीनच्या डोकेदुखीला अमेरिकेची काडी; पहा नेमके काय केलेय बायडेन प्रशासनाने

दिल्ली : चीन आणि फिलिपीन्समध्ये सध्या तणाव निर्माण झाला आहे. दक्षिण चीन समुद्रातील एक बेट वादाचे कारण ठरले आहे. या बेटावर सध्या फिलिपीन्सचे नियंत्रण आहे. मात्र, काही काळापासून चीन हे बेट बळकावण्याच्या प्रयत्नात आहे. या परिसरात चीनची जहाजे आणि नौका दिसत आहेत. या प्रकारावरुन फिलिपीन्सने चीनला ठणकावले होते. मात्र, चीन ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे तणाव वाढला आहे.

Advertisement

अमेरिका आणि चीन या दोन देशात सध्या वर्चस्वाचा संघर्ष सुरू झाला आहे. संधी मिळेल तेव्हा एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न दोन्ही देश करत असतात. कोरोनाच्या मुद्द्यावर अमेरिकेने चीनची चांगलीच कोंडी केली आहे. त्यानंतर आता पुन्हा असाच प्रकार अमेरिकेने पुन्हा केला आहे. ज्यामुळे चिनी ड्रॅगनचा निश्चित संताप होणार आहे. चीनचा शत्रू असलेल्या फिलिपीन्सला 12 ‘एफ-16’ लढाऊ विमानांची विक्री करण्यास अमेरिकेने मंजुरी दिली आहे. तसेच साइडविंडर आणि हार्पून मिसाइल्सचाही करार केला आहे. यामुळे फिलिपीन्सची ताकद वाढणार आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे चीनचा मात्र तिळपापड होणार आहे.

Advertisement

Loading...
Advertisement

या परिसरात चीनने आपले सैन्य जहाज आणि मासेमारी करणाऱ्या नौका आणू नयेत, असे फिलीपीन्सने म्हटले होते. चीनने मात्र असे काहीच न करता उलट उत्तर चीन या क्षेत्राचे संरक्षण करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या दोन्ही देशांतही सध्या तणाव आहे. या परिसरातील प्रत्येक देश आता चीनच्या विरोधात आवाज उठवू लागला आहे. अमेरिकेच्याही ही गोष्ट लक्षात आली आहे. त्यामुळे अमेरिका या देशांना पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सुद्धा चीनने दक्षिण चीन समुद्र परिसरावर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. चीनच्या या कारवायांचा त्रास मात्र लहान देशांना सहन करावा लागत आहे. चीनची सैन्य ताकद खूपच जास्त आहे. या ताकदीच्या जोरावर चीन या देशांना त्रास देत आहे. कितीही विरोध केला तरी चीन ऐकण्याच्या मानसिकतेतच नाही. त्यामुळेच या परिसरात आता रोज नवे वाद निर्माण होऊ लागले आहेत.

Advertisement

तसे पाहिले तर दक्षिण समुद्राच्या परिसरावर चीन आपलाच हक्क असल्याचा दावा करत आहे. तर ब्रुनेई, मलेशिया, फिलीपीन्स, तैवान, व्हिएतनाम हे अन्य देश सुद्धा या क्षेत्रावर दावा करत आहेत. चीनने या परिसरात अनेक मानवनिर्मित बेट तयार केली आहेत. आता चीन या बेटांचा वापर सैन्य ठिकाणांच्या रुपात करत आहे. याच कारणामुळे या परिसरात तणाव वाढला आहे. चीनच्या उद्योगांना बाकीचे देश अक्षरशः वैतागले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply