Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बापरे… चीनने केलीय अशी लबाडी; कोरोनाचे ‘ते’ सत्य दडपण्यासाठी केला असा कारनामा

दिल्ली : कोरोना विषाणूच्या उगमाच्या मुद्द्यावर अमेरिकेने चीनची चांगलीच कोंडी केली आहे. कोरोना वायरस वुहान प्रयोगशाळेतुनच लीक झाल्याचा दावा केला जात आहे, काही शास्त्रज्ञांनी तसे पुरावे सुद्धा मिळाले असल्याचे सांगितले आहे. जगभरातील विविध संस्थांचे जे अहवाल येत आहेत, त्यातही हा विषाणू प्रयोगशाळेतूनच पसरल्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे, तसे आरोपही चीनवर सातत्याने होत आहेत.
अमेरिकेने तर एक पाऊल पुढे टाकत या विषाणूचा ठावठिकाणा हुडकून काढण्याचे आदेश आपल्या गुप्तचर संस्थांना दिले आहेत. या घडामोडींमुळे चीन नरमेल, असे वाटत होते. मात्र, याचा काहीच परिणाम चीनवर झालेला नाही.

Advertisement

त्यानंतर चीन आणि वुहान प्रयोगशाळेचा असाच एक नवा उद्योग उघड झाला आहे. कोरोना विषाणूचा स्त्रोत उघड होईल, या भितीने वैज्ञानिकांनी अत्यंत महत्वाचा असा सुरुवातीच्या रुग्णांचा डेटा नष्ट केला आहे. वुहान येथून अनेक रुग्णांची नमुना चाचणी आंतरराष्ट्रीय डेटाबेसवरुन डिलीट करण्यात आली आहे. हा डेटाबेस कोरोनाच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

Advertisement

असे असले तरी, अमेरिकन प्रोफेसरने मात्र यातील काही डेटा रिकव्हर केला आहे. अमेरिकन प्रोफेसर जेम्स ब्लूमने सांगितले, की चीनने ज्यावेळेस कोरोनाची माहिती जगाला दिली, त्याच्या फार आधीच हा आजार चीनमध्ये पसरला होता. चीनने हा डेटा डिलीट केला असावा जेणेकरुन कोरोनाची माहिती लपवून ठेवता येईल, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

दुसरीकडे चीनने मात्र कोरोना विषाणू आटोक्यात आणण्यासाठी वुहान प्रयोगशाळेने चांगली कामगिरी केल्याचे सांगत चायनीज अकेडमी ऑफ सायन्सेसने वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीस हा पुरस्कार जाहीर केला आहे. या प्रयोगशाळेने केलेल्या अनेक महत्वाच्या संशोधनाद्वारे कोरोना विषाणूचा उगम, महामारीचे विज्ञान समजण्यास मदत मिळाली, असेही अकेडमीने सांगितल्याचे काही अहवालात म्हटले आहे. प्रयोगशाळेने कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी तसेच कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी महत्वाचे योगदान दिले आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, याआधी अमेरिकेचे विषाणू तज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांनी पुन्हा एकदा चीनवर संशय व्यक्त केला होता. त्यांनी एका मुलाखतीत असे म्हटले, की कोरोना विषाणू प्रयोगशाळेत तयार केलेला असू शकतो. कोरोना विषाणू प्रयोगशाळेतून लीक झाल्याचा जो दावा केला जात आहे त्यामागे सुद्धा असाच संशय आहे की हा विषाणू प्रयोगशाळेतच तयार केलेला असू शकतो. हा विषाणू एखाद्या दुर्घटनेत वुहान प्रांतातील प्रयोगशाळेतून बाहेर पडला असण्याची सुद्धा शक्यता आहे.

Advertisement

चीन तसाही विश्वासघातकीच आहे आणि जगाला याचा अनुभव सुद्धा आहे. त्यामुळे चीनचा हा आणखी एक डाव सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चीनच्या या अशा कृत्यांमुळे जगाचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, याची आजिबात शक्यता नाही.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा. 

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply