Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

लसीकरण करा, नाहीतर देशातून चालते व्हा…! ‘या’ देशाच्या राष्ट्रपतींनी दिलीय नागरिकांना धमकी; पहा, नेमका काय आहे प्रकार

दिल्ली : कोरोनास रोखण्यासाठी आता लसीकरण हाच पर्याय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. लसीकरण मोहिमही सुरू आहे. लोक लस सुद्धा घेत आहेत. मात्र, जगात असेही काही देश आहेत, जेथील लोकांच्या मनात लसीकरणाबाबत शंका आहेत, अफवांनी मनात भिती निर्माण केली आहे.. त्यामुळे लस घेण्याची हिंमत होत नाही.. या अनाठायी कारणांनी लसीकरणाच मार्ग रोखला आहे. मात्र, तरीसुद्धा लसीकरण करावेच लागणार आहे. मग काय काही देशांनी भन्नाय आयडीया वापरल्या तर काही देश त्यांच्या नागरिकांना थेट धमकीच देत आहेत.

Advertisement

होय, हे खरे आहे. फिलीपीन्सच्या राष्ट्रपतींना नागरिकांना अशीच धमकी दिली आहे. तसेही, या देशाचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते अशाच अजब वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. याआधीही त्यांनी अनेकदा अशी विधाने केली आहेत. आता मात्र लसीकरणावरुन त्यांनी थेट धमकीच दिली आहे. देशातील ज्या लोकांना लसीकरण करायचे नसेल त्यांनी देश सोडून चालते व्हावे. भारत, अमेरिका जेथे वाटेल तेथे निघून जावे पण, फिलीपीन्य सोडावे.

Advertisement

ते पुढे म्हणाले, की यावेळी देश मोठ्या संकटाचा सामना करत आहे. देशात राष्ट्रीय आपातकाल आहे. देशात जो कोणी लसीकरण करणार नाही, त्यास अटक करण्यासही मागेपुढे पाहणार नाही. देश आधीपासूनच कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण गरजेचेच आहे.

Advertisement

दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण हाच पर्याय आहे. त्यामुळे जगातील देशांनी लसीकरणावर भर दिला आहे. विकसित देशांनी आपल्या देशात वेगाने लसीकरण सुरू केले आहे. दुसरीकडे अनेक गरीब देशांना अजून लसी सुद्धा मिळालेल्या नाहीत, त्यामुळे या देशात लसीकरण सुरू करता आलेले नाही. त्यातच भारताने लसींचा पुरवठा बंद केल्याने अडचणी अधिकच वाढल्या आहेत. मात्र, या देशांमध्ये सुद्धा लसीकरण होणे गरजेचे आहे. त्याशिवाय कोरोना विरुद्धची लढाई जिंकताच येणार नाही.
कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता लसीकरण मोहिमेस वेग देणे आवश्यक आहे, त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने भारत आणि सिरम इन्स्टिट्यूटकडे मदत मागितली आहे. सध्या अनेक देशात लसींची कमतरता आहे. त्यामुळे लसीकरणात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

Loading...
Advertisement

जगात असे अनेक देश आहेत जिथे कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला आहे, त्यानंतर दुसऱ्या डोससाठी लसी मिळाल्या नाहीत. जगातील जवळपास 30 ते 40 देशांमध्ये अशी अडचण जाणवत आहे. यासाठी भारत सरकार आणि सिरम इन्स्टिट्यूटने तत्काळ लसी उपलब्ध करून घ्याव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे. आजमितीस आफ्रिका, लॅटिन अमेरिका, मध्य पूर्व आणि दक्षिण आशियातील देशांत लसींची टंचाई निर्माण झाली आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा. 

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा

Advertisement
Advertisement

Leave a Reply