Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

किम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन

दिल्ली : वर्तमान जगात सर्वाधिक क्रूरकर्मा हुकुमशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किम जोंग उन यांच्या उत्तर कोरिया देशाला सध्या अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यातून देशाला बाहेर काढण्यासाठी मदतीचे आवाहन या हुकुमशहाने स्थानिक जनतेला केले आहे. अर्थात आवाहन म्हणजे ही त्यांना स्पष्ट सूचनाच आहे म्हणा.

Advertisement

हुकूमशहा किम जोंग उन यांनी देशवासियांना असा इशारा दिला आहे की, देशात गंभीर अन्न संकट उद्भवू शकते. किम जोंग यांनी अधिकाऱ्यांना कृषी उत्पादन वाढविण्याचे मार्ग शोधण्यास सांगितले आहे. लोकांचे अन्न संकट आता या देशात तणावपूर्ण बनत आहे. हुकूमशहा किम जोंग यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा कमी वजनामुळे तो जगभर चर्चेचा विषय आहे. उत्तर कोरियाची वृत्तसंस्था केसीएनएने मंगळवारी सांगितले की, किम जोंग उन यांनी सत्ताधारी कामगार पक्षाचे पूर्ण अधिवेशन सुरू केले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना अन्न संकटाविषयी इशारा दिला. वास्तविक, कोरोना संकटामुळे उत्तर कोरियाने चीनशी असलेली सीमा बंद केली आहे. दरम्यान, अनेक वादळ व पुरामुळे देशातील पिके वाया गेली. त्यामुळे हा देश संकटात आहे.

Advertisement

उत्तर कोरियामधील सरकारी अक्षमतेमुळे १९९० च्या दशकात स्थानिक जनतेची उपासमार झाली होती. असा अंदाज आहे की, यामध्ये कोट्यवधी उत्तर कोरियाई मारले गेले. उत्तर कोरियावर देखरेख ठेवणाऱ्या संघटनांचे म्हणणे आहे की सध्या या चार बाजू असलेल्या देशात मोठ्या प्रमाणात उपासमार दिसून येत नाही. त्याचबरोबर काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की उत्तर कोरियामध्ये वादळापूर्वीची ही शांतता आहे. अन्नाचा अभाव आणि इतर समस्या यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होऊ शकते.

Loading...
Advertisement

दक्षिण कोरिया सरकारच्या विकास संस्थेचे म्हणणे आहे की, उत्तर कोरियाला यावर्षी दहा लाख टन खाद्यान्न कमी पडण्याच्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. नुकतीच किम जोंग उनची ताजी छायाचित्रे समोर आली होती. यात उत्तर कोरियाचा हा हुकूमशाहा गबदुला न दिसता कमकुवत आणि शिडशिडीत दिसत होता. यानंतर पुन्हा एकदा किम जोंग उनच्या तब्येतीविषयीच्या अफवांचे बाजार जगभर तापले आहे. असे म्हणतात की किम जोंगला मधुमेह आणि उच्च रक्तदाब याची समस्या आहे. बैठकीत किमने कोरोना लॉकडाउन सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply