Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

करोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’ प्रकरण; पहा RTI ची कमाल..!

Please wait..

मुंबई : देशभरातील राज्य आणि केंद्र सरकारने माहिती अधिकार कायदा (RTI) बोथट करण्याचा खेळ चालवला आहे. त्यातील काही त्रुटी पुढे करून सामान्यांपासून पुन्हा एकदा माहिती कप्पेबंद करण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, याच कायद्याच्या प्रभावी वापरामुळे जगातील सर्वात मोठा करोना घोटाळा उघडकीस आलेला आहे.

Advertisement

उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये एप्रिल महिन्यात पार पडलेल्या कुंभमेळ्यासंदर्भातील हा धक्कादाक आणि भारतातील हजारो लोकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा हा घोटाळा उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. करोना कालावधीमध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी होणाऱ्या या कुंभमेळ्याच्या आयोजनाला परवानगी दिल्याने जगभरातून केंद्र व राज्य सरकारला धारेवर धरले गेले आहे. त्यानंतर आलेल्या दुसऱ्या लाटेत हजारो लोकांचा बळी आणि लाखो कुटुंबियांचे पैसे रुग्णालयात खर्च झालेले आहे. रुग्णालयाच्या खर्चाने अनेकांचे जीवन उध्वस्त झालेले आहे. त्यातच आता कुंभमेळ्यामधील करोना चाचाण्यांसंदर्भातील घोटाळा उघडकीस आल्याने अवघे जग थक्क झालेले आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “#मराठा_आरक्षण #आरक्षण #आंदोलन : संभाजीराजे यांनी घेतली ‘ही’ महत्वाची भूमिका; पहा नेमके काय चालू आहे #कोल्हापूर मध्ये @krushirang https://t.co/C0XrpOR5u1” / Twitter

Advertisement
Loading...

पंजाबमधील फरीदकोट येथे राहणाऱ्या विपन मित्तल या एलआयसी एजंटच्या सतर्कतेमुळे हा महाघोटाळा उघडकीस आलेला आहे. याद्वारे जनतेच्या पैशांची फसवणूक करतानाच लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा जीवघेणा डाव केल्याचेही पुढे आलेले आहे. २२ एप्रिल रोजी मोबाइलवर करोना चाचणीचा निकाल निगेटीव्ह असल्याचा मेसेज मित्तल यांना आल्याने या घोटाळ्याचा पर्दाफाश झालेला आहे. आपली खासगी माहिती चोरीला जात असल्याची शंका आल्याने त्यांनी यासंदर्भातील चौकशीला सुरुवात केली. संबंधित यंत्रणांकडे तक्रार करून पुढे काहीच न समजल्याने मग त्यांनी थेट माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज केला. अर्जाला आलेल्या उत्तरामधून हा करोना चाचणी घोटाळा समोर आला आहे.

Advertisement

Advertisement

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यात रस न दाखवल्याने मित्तल यांनी थेट इंडियान काउंसिल ऑफ मेडिकल रिचर्सला ई-मेल करुन तक्रार दाखल केली. त्यांनी तपासाचे आश्वासन दिले. दरम्यान, मित्तल यांनी करोना चाचणीचा मेसेज आलेल्या प्रयोगशाळेसंदर्भातील माहिती मिळवण्याच्या उद्देशाने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज करून टाकला. आयसीएमआरने या अर्जाच्या आधारे चौकशी केल्यावर मित्तल यांच्या करोना चाचणीसाठी सॅम्पल हरिद्वारमध्ये घेऊन तपासल्याचे पुढे आले. मग मित्तल यांची तक्रार उत्तराखंड आरोग्य विभागाकडे पाठवर असे स्पष्ट झाले की,  मित्तल यांच्या नावाचा त्या एक लाख लोकांच्या यादीमध्ये समावेश आहे ज्यांच्या करोना चाचण्यांचे खोटे अहवाल हरयाणामधील एका एजन्सीने तयार केलेले आहेत.

Advertisement
RTI द्वारे हातात आलेल्या अहवालातील महत्वाचे मुद्दे असे :
एजन्सीकडून करण्यात आलेल्या एक लाख चाचण्यापैकी फक्त १७७ रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. म्हणजे त्यावेळी पॉझिटिव्हिटी रेट ०.१८ टक्के असल्याचे दिसते. मात्र, त्याच कालावधीत हरिद्वारमधील पॉझिटिव्हीटी रेट १० टक्क्यांवर होता
चाचणी केलेल्या यादीत देण्यात आलेली नाव आणि पत्ते खोटे असल्याची माहिती स्पष्ट झालेली आहे
अनेक लोकांचा फोन नंबर सारखेच असून अनेकांच्या अ‍ॅण्टीजन चाचण्यांचे किटही सारखेच असल्याची धक्कादायक बाब स्पष्ट झाली आहे
या यादीत राजस्थानमधील अनेक विद्यार्थ्यांची नावे आहेत
जे कुंभमेळ्यात गेलेच नाहीत असेच लॉक या यादीत दिसत आहेत

 

Advertisement

कुंभमेळ्याच्या कालावधीमध्ये करोना चाचण्या करण्यासाठी आठ संस्थांच्या माध्यमातून तब्बल चार लाख चाचण्या करण्यात आल्याने हा घोटाळा उघडकीस आल्यावर इतर संस्थांची चौकशी सुरु झाली आहे. त्याच्या चौकशीतून आणखी पुढे काय येते याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलेय की, खोट्या चाचण्यांची एकूण संख्या किती आहे हे तपासानंतरच सांगता येईल. या प्रकरणामध्ये सहभाग असणाऱ्यांवर गरज पडल्यास गुन्हेगारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply