Take a fresh look at your lifestyle.

मुजोर चीनच्या अडचणीत वाढ; पहा G7 नंतर कोणी दिलाय त्यांना गंभीर इशारा

दिल्ली : भारताचा कुरापतखोर शेजारी आणि श्रीमंतीच्या मुजोरीत असलेल्या चीन या देशाच्या अडचणीत आणखी वाढ होत आहेत. अमेरिका आणि जी-७ देशांच्या संघटनेने करोना विषाणूच्या विषयावर या देशाला सुनावले असतानाच आता जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस यांनीही चीनला ठणकावले आहे. त्यामुळे चीनच्या अडचणीत वाढ झालेली आहे.

Advertisement

मात्र, कोणत्याही देशाच्या दबावाला न झुकणाऱ्या या देशाने यावर अजूनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कोरोना विषाणूच्या स्रोताचा शोध घेण्यासाठी चीनने मदत करण्याचे आवाहन G7 नंतर आता WHO नेही केलेले आहे. डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जी-७ शिखर परिषदेला संबोधित करताना चीनला सुनावले असल्याचे द वॉल स्ट्रीट जर्नल या जगप्रसिद्ध दैनिकाने म्हटलेले आहे.

Advertisement

Advertisement

विषाणूचे मूळ समजून घेणे किंवा ते जाणून घेण्यासाठी जगाला पारदर्शक पद्धतीने मदत करण्याची गरज आहे. त्यासाठी चीनकडून आम्हाला सहकार्य हवे आहे. विषाणूच्या उगमासंबंधी आणि डेटा उपलब्ध करून देण्यासंदर्भात दबाव टाकला जाऊ शकत नाही. मात्र, चीनची भूमिका संशयास्पद मानली जात आहे. त्यामुळे आता चीन याला काय प्रत्युत्तर देणार याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply