Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारपुढे अखेर ‘ट्विटर’चे लोटांगण, सगळे नियम पाळण्यास तयार, ‘ट्विटर’ने नेमकं काय म्हटलंय पहा.. .

नवी दिल्ली : मोदी सरकारने फेब्रुवारीत नव्या आयटी नियमांची घोषणा केली होती. या नियमांचं पालन करण्यासाठी सरकारने सोशल मीडिया (Social Midia) कंपन्यांना तीन महिन्यांचा अवधी दिला. या नियमानुसार सोशल मीडिया कंपन्यांनी मुख्य नोडल अधिकारी, तक्रार निवारण अधिकारी आदींची नियुक्ती करण्यास सरकारने सांगितले होते. फेसबुक (Facebook), गुगलने (Google) सरकारी नियम पाळण्याची तयारी दर्शवली. मात्र, ट्विटरने (Twitter) नवे डिजिटल नियम पाळण्यास नकार देत थेट केंद्र सरकारसोबत पंगा घेतला.

Advertisement

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू ट्विटर हॅण्डलवरील ‘ब्लू टिक’ काढल्यानंतर तर केंद्र सरकार विरुद्ध ट्विटर, यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. नियमांचं पालन करण्यास तयार नसल्यामुळे सरकारने गेल्याच आठवड्यात कंपनीला कडक शब्दांत शेवटची नोटीस पाठवली. त्यानंतर अखेर ‘ट्विटर’ नमल्याचे दिसत आहे.

Advertisement

केंद्र सरकारच्या दणक्यानंतर मायक्रोब्लॉगिग प्लॅटफॉर्म ट्विटरला जाग आली. सरकारी नियमांचे पालन करण्याची तयारी कंपनीने दर्शविली आहे. त्यामुळे नव्या आयटी नियमांचं पालन करण्यासंदर्भात ट्विटर आणि भारत सरकार यांच्यातील वादावर आता पडदा पडल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

केंद्राचे नवे नियम पाळण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी तयार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यानुसार कंपनीने कंत्राटी तत्त्वावर निवासी तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. मुख्य तक्रार अधिकाऱ्याच्या कायमस्वरूपी नेमणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

Advertisement

ट्विटरच्या प्रवक्त्याने निवेदनामध्ये म्हटले आहे, की ‘‘सरकारी नियमांचे महत्त्व आम्हाला पटले असून, आम्ही सगळे नियम लागू करणार आहोत. सरकारने 25 फेब्रुवारी रोजीच अधिसूचना जाहीर केली होती; पण कोरोनामुळे सगळी यंत्रणा ठप्प झाल्याने नव्या नियुक्त्या करणे शक्य झाले नाही. मात्र, पुढील काही दिवसांत आम्ही सर्व तपशील सादर करू.’’

Advertisement

सध्याच्या आणीबाणीच्या काळामध्ये आम्ही भारतीयांच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे ‘ट्विटर’कडून सांगण्यात आले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply