आणि त्यामुळे मग जगामध्ये येणार ‘ती’ संकटसाखळी; पहा नेमके काय म्हटलेय संशोधकांनी
दिल्ली : जगात सध्या संकटांची मालिकाच सुरू झाली आहे. कोरोना सारखा भयानक विषाणू आला. या विषाणून जगातच उच्छाद मांडला. त्यानंतर कुठे चक्रीवादळे तर कुठे भीषण दुष्काळ, ज्वालामुखीचा उद्रेक, अवकाळी पाऊस अशी अनेक संकटे आपण पाहिली. या संकटांतून सावरत असताना आता पुन्हा संकटे नकोत, असेच सगळ्यांना वाटते. पण, जरा थांबा अजूनही काही संकटे येणार असून तज्ज्ञ मंडळींनी त्याचा इशारा आताच देऊन ठेवला आहे.
हवामान बदलाची समस्या तशी जुनीच आहे. मात्र, नजीकच्या काळात या समस्येने घातक रुप धारण केले आहे. यासही आपणच कारणीभूत आहेत. हवामान बदलाचा पृथ्वीवर काय परिणाम होत आहे, भविष्यात त्याचे किती भयानक दुष्परिणाम होतील, याची जाणीव करुन दिली होतीच ना.. पण, जगाने नेहमीप्रमाणे दुर्लक्षच केले. काही प्रयत्नही केले गेले. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उपयोग होईल तरी कसा, कारण, ज्या पद्धतीने नियोजन कार्यवाही करणे अपेक्षित होते, तसे काही घडलेच नाही. त्यामुळेच आज ही समस्या जास्तच त्रासदायक ठरत आहे.
आता पुन्हा शास्त्रज्ञांनी असाच इशारा दिला आहे. हवामान बदलाच्या संकटास वेळीच रोखले गेले नाही तर भविष्यात आधिक गंभीर परिणाम होतील, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. हवामानात असेच बदल होत राहिले तर भ0विष्यात मुसळधार पाऊस होऊन अनेक ठिकाणी पूर येण्याचा धोका असल्याचा अंदाज आहे. न्यूकैसल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञ आणि एका जागतिक संस्थेच्या पथकाने असा इशारा दिला आहे, की जागतिक तापमान असेच वाढत राहिले तर पृथ्वीवर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि पूर येण्याचा धोका आहे. जागतिक तापमान वाढ जर १.५ डिग्रीपर्यंत नियंत्रित करता आले तर भविष्यातील मुसळधार पावसाच्या संकटास काही प्रमाणात रोखता येऊ शकेल, असे म्हटले आहे.
दरम्यान, सध्याच्या काळात पृथ्वीवरील हवामानात सातत्याने बदल होत आहे. तापमानात सुद्धा वाढ होत आहे. त्यामुळे नैसर्गिक संकटे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. मागील वर्षात तर अशी अनेक संकटे येऊन गेली आहेत. कडाक्याच्या उन्हाळ्यात मुसळधार पावसाचा अनुभव घेतला आहे. चक्रीवादळे पाहिली आहेत. भविष्यात आधिक दुष्परिणाम होऊ द्यायचे नसतील तर जगातील देशांनी आता तरी ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार नियोजन करुन प्रयत्न केले तर भविष्यातील या संकटांना कमी करता येईल.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.