Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून मुलांच्या लसीकरणाला तज्ञांचाही विरोध; पहा नेमके काय म्हटलेय डॉक्टर ग्रुप 40 यांनी

Please wait..

दिल्ली : भारतात लसटंचाईवर तोडगा काढण्यात केंद्र सरकारला अजूनही यश आलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारतर्फे यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी दुसरी लाट ओसरत आहे. मात्र, तिसऱ्या लाटेबाबत चर्चा सुरू आहे. अनेक तज्ञांनी तिसऱ्या लाटेत 18 वर्षाखालील लहान मुलांना तिसऱ्या लाटेत जास्त धोका होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मुलांच्या लसीकरणाचा मुद्दाही पुढे येत आहे. अशावेळी जगभरातील वैद्यकीय क्षेत्रात नाव असलेल्या डॉक्टर ग्रुप 40 यांनी मुलांच्या लसीकरण अभियानास काही मुद्द्यांवर विरोध दर्शवला आहे.

Advertisement
Loading...

अमेरिकेमध्ये १२ वर्षांखालील मुलांना फायझरची लस देण्याची परवानगी मिळाली असून कॅनडामध्येही असे लसीकरण होत आहे. इंग्लंडमध्येही सरकार मुलांच्या लसीकरणाच्या दृष्टीने विचार करत असतानाच पॅथाॅलाॅजिस्ट, तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या पथकाने मुलांना लस न देण्याचा सल्ला दिला आहे. जागतिक पातळीवर काम करणारे सुमारे ४० वैद्यकीय तज्ञ असलेल्या या ग्रुपने मुलांना लस देणे हे अनावश्यक, बेजबाबदारपणाचे आणि नीतिमत्तेला धरून नसल्याचे म्हटल्याने खळबळ उडाली आहे.

Advertisement

‘द डिफेंडर- चिल्ड्रेन्स हेल्थ डिफेन्स, न्यूज अॅंड व्ह्यूज’ (40+ Doctors Tell UK Drug Regulators: Vaccinating Kids for COVID is ‘Irresponsible, Unethical and Unnecessary’ • Children’s Health Defense (childrenshealthdefense.org)) यावर याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे. इंग्लंडमधील प्रख्यात बालरोगतज्ञ डॉक्टर राॅसमंड जोन्स, लॉर्ड मुनी, प्रोफेसर अँटनी फ्रेेयर, कॅरोल शिकोरा, अॅग्नस डेगेलिस, भारतीय वंशाच्या डॉक्टर पद्मा कथन, डॉक्टर के. सिंग यांच्यासह 40 जणांची टीम मुलांच्या लसीकरणाच्या विरोधात मत व्यक्त करीत आहे.

Advertisement
तज्ञांचे मुद्दे असे :
आतापर्यंत 15 वर्षाखालील मुलांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे उदाहरण नाही. मुलांची शारीरिक क्षमता व प्रतिकारशक्ती याचा विचार करता त्यांना संसर्ग रोखण्यासाठी लसीची आवश्यकता नाही
कोरोना प्रतिबंधासाठी मुलांना देण्यात यायची लस अद्याप पूर्णपणे विकसित झालेली नाही
काेराेना प्रतिबंधासाठी जगात अद्यापपर्यंत सर्वसमावेशक अशी एकच लस तयार हाेऊ शकलेली नाही
शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करण्याची धावपळ आणि मुलांची शारीरिक क्षमता यांचा संपूर्ण विचार करता या लसीकरणाचे दीर्घकाळामध्ये त्यांच्यात विपरीत परिणाम होऊ शकतात
चाळीशीच्या वयाेगटातील मृतांमध्ये उत्तरीय तपासणीनंतर अनेक दुष्परिणाम दिसले आहेत
लस घेतलेल्या अनेकांमध्ये रक्तवाहिन्यांच्या विकारांसारखे परिणाम दिसून अाले अाहेत
लस घेतलेल्या महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यान अनियमितता, पोटदुखी, अतिरिक्त रक्तस्त्राव यासारख्या तक्रारी आहेत
लसीमुळे शरीरात हाेणारे जनुकिय बदल पाहता मुलांवर या लसींच्या चाचण्यांे परिणाम स्पष्ट झाल्यावरच त्यांचे लसीकरण करावे

 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply