Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मोदींच्या कार्यकाळात करोना संकटामुळे देश बदनाम झाला; कॉंग्रेसचे कमलनाथ यांचा गंभीर आरोप

दिल्ली : करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. काँग्रेसचे नेते पत्रकार परिषदा घेत केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. राहुल गांधी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही पत्रकार परिषदेत करोना काळातील मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार प्रहार केला आहे.

Advertisement

केंद्रातील मोदी सरकार ३० मे रोजी आपला सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. यानिमित्ताने कमलनाथ यांनी मोदी सरकारला काही सवाल केले. त्यांनी म्हटले, की देशातील युवकांना रोजगार देणार होता, त्याचे काय झाले, देशात सातत्याने वाढत चाललेल्या महागाईचे काय, देश केवळ घोषणांवरच चालणार आहे का? करोना माफियांविरोधात आम्ही संघर्ष करत आहोत मात्र, भाजपचे नेते व्हेंटीलेटर्स, बेड्स, इंजेक्शन विकत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. जगात आज भारत देश महान नाही तर बदनाम झाला आहे. करोनामुळे आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यास सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे, असाही आरोप कमलनाथ यांनी केला. त्यानंतर कमलनाथ यांनी राज्य सरकारच्या कारभारावरही ताशेरे ओढले. राज्यात आतापर्यंत किती जणांचे लसीकरण झाले हे का सांगितले जात नाही, आकडेवारी जनतेसमोर का ठेवत नाहीत, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

Loading...
Advertisement

राज्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. मात्र, करोनाच्या काळात नागरिकांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आता या परिस्थितीतून राज्याला बाहेर काढणे कठीण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, करोना परिस्थिती केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. दुसऱ्या लाटेत गाफील राहिल्याने आज देशात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप करत आहे. अधूनमधून विदेशी माध्यमातही भारतातील करोना परिस्थितीबाबत अहवाल प्रसिद्ध होत असतात. या अहवालांचा हवाला देत विरोधक टीका करत असतात. मुळात या मुद्द्यावर देशात रोजच राजकारण होत आहे. आता तर विरोधी पक्षांनी आक्रमक रणनिती तयार केली आहे. सरकारला घेरण्याचा कोणताही मुद्दा विरोधक सोडत नाहीत. करोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती हाताबाहेर गेली. रुग्णसंख्या प्रचंड वाढली. रुग्णांना ऑक्सिजन मिळेना, अनेक रुग्णांना ऑक्सिजनअभावी प्राण गमवावे लागले. त्यानंतर केंद्र सरकारचे लसीकरणाचे नियोजनही कोलमडले आहेत. देशात करोना लसींची कमतरता आहे, अशा अनेक मुद्द्यावर विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या कारभारावर टीका करत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply