Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

काळजी घ्या रे.. करोनाला हरवल्यावरही वाढल्यात दवाखान्याच्या चकरा; पहा नेमके काय म्हटलेय अहवालात

मुंबई : करोनामुळे आज संपूर्ण जगच हैराण झाले आहे. या विषाणूने आतापर्यंत कोट्यावधी लोकांना संक्रमित केले आहे. या आजारामुळे लाखो लोकांचे प्राण गेले आहेत. तर अनेक जणांनी या घातक विषाणूस मातही दिली आहे. करोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये असेही काही लोक आहेत, ज्यांना आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असून सतत दवाखान्यात जावे लागत आहे, असे ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित एका अहवालातून समोर आले आहे.

Advertisement

या अहवालात असे म्हटले आहे, की जवळपास १४ टक्के रुग्णांना कोणत्या तरी नव्या आजारामुळे दवाखान्यात जावे लागते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ रिसर्चच्या संशोधकानी मागील वर्षातील जानेवारी ते ३१ ऑक्टोबर या काळात सार्स-कोव-२ व्हायरस संक्रमित १ लाख ९३ हजार ११३ रुग्णांच्या आरोग्याचा अभ्यास केला. संक्रमण झाल्यानंतर कमीत कमी २१ दिवसांपर्यंत या रुग्णांमध्ये निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्यांचा अभ्यास केला. तसेच विषाणूस मात दिल्यानंतर सहा महिन्यांच्या काळात किती रुग्णांना काही नवीन आजार झाला का, याचाही अभ्यास केला.

Advertisement

या अभ्यासाद्वारे जे काही आकडे मिळाले त्याची तुलना करोना करोना वगळता विविध आरोग्य समस्यांमुळे दवाखान्यात भरती होणाऱ्या रुग्णांच्या संख्ये बरोबर करण्यात आली. त्यानंतर असे दिसून आले, की सार्स-कोव-२ वायरसच्या विळख्यात सापडलेल्या १४ टक्के रुग्णात किमान एक तरी नवीन आरोग्य समस्या निर्माण होत आहे, ज्यामुळे त्यांना दवाखान्यांच्या चकरा माराव्या लागत आहेत. नवीन आरोग्य समस्यांमुळे दवाखान्या भरती होण्याचे प्रमाणही जास्त असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट होत आहे. डॉक्टर विलियन शेफनर यांनी सांगितले, की करोनातून बरे झालेल्या रुग्णांना आरोग्यासंबंधी अनेक भेडसावत असल्याचे दिसून आले आहे.

Loading...
Advertisement

करोनातून बरे झाल्यानंतर आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. काही जणांना दुसरेही आजार होत असल्याचे दिसून आले आहे. भारतात सध्या ब्लॅक फंगसच्या आजाराने थैमान घातले आहे. करोनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांना हा आजार झाला आहे. ब्लॅक फंगसप्रमाणेच व्हाइट आणि येलो फंगसचेही रुग्ण देशात आढळत आहेत. तसे  पाहिले तर देशात करोना अजून नियंत्रणात आलेला नाही. आजही लाखोंच्या संख्येत नवीन रुग्ण आढळत आहेत. मृत्यूदर सुद्धा वाढला आहे. त्यामुळे या आजाराचा धोका अजून टळलेला नाही. आता तर तिसऱ्या  लाटेचाही इशारा देण्यात येत आहे. करोनाचा धोका तर आहेच. मात्र, दुसरे आजारही बळावत चालले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply