Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून चीनचा झालाय तिळपापड; पहा गुप्तचर संस्थांना नेमके काय आदेश दिलेत करोनाबाबत ते..

दिल्ली : करोना विषाणूच्या उत्पत्तीच्या मुद्द्यावर अमेरिका आणि चीन दरम्यान सुरू असलेला वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, या मुद्द्यावर आता अमेरिकेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अमेरिकी राष्ट्रपती जो बायडेन यांनी करोना विषाणूच्या उत्पत्तीचे ठिकाण शोधण्यासाठी गुप्तचर संस्थांनी दुप्पट वेगाने प्रयत्न करावते, तसेच ९० दिवसांच्या आत हे ठिकाण शोधून त्याचा अहवाल द्यावा, असे आदेश दिले आहे. बायडेन यांनी असे आदेश दिल्याने सहाजिकच आहे, की चीनचा तिळपापड होणार आहे.

Advertisement

त्यामुळे या दोन्ही देशांत वाद आणखीच वाढणार आहे, याची जाणीव असतानाही अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. करोना व्हायरस एखाद्या संक्रमित प्राण्याद्वारे माणसांत फैलावला की प्रयोगशाळेतून आला, याबाबत ठोस पुरावे अद्याप मिळालेले नाहीत, असे बायडेन यांनी सांगितले. अमेरिकेतील प्रयोगशाळांनी तपास संस्थांची मदत करावी तसेच चीनने सुद्धा जागतिक पातळीवरील तपासकार्यात मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, याआधी मार्च महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिकांच्या एका पथकाने चीनचा दौरा केला होता. या पथकाने वुहानच्या त्या प्रयोगशाळेत जाऊन तपासणी सुद्धा केली होती. मात्र, असे अनेक मुद्दे होते, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आरोग्य संघटनेच्या अहवालावर कोणताही देश विश्वास ठेवण्यास तयार नाही. त्यानंतर अमेरिकेच्या ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानंतर मात्र जगभरात खळबळ उडाली.

Loading...
Advertisement

या अहवालात असा दावा करण्यात आला होता, की नोव्हेंर २०१९ मध्येच वुहानच्या प्रयोगशाळेतील काही संशोधक आजारी पडले होते. त्यांना दवाखान्यात करण्यात आले होते. मात्र, चीनने ही बातमी जगाला कळूच दिली नाही. चीनच्या या कृत्यामुळे संशय आधिकच बळावला आहे. चीनला कायमच पाठीशी घालणाऱ्या आरोग्य संघटनेने पुन्हा तपासणी करण्याचा विचार सुरू केला आहे. करोनाबाबत सुरू असलेल्या या घडामोडी चीनसाठी मात्र डोकेदुखी ठरत आहेत. दरम्यान, चीनने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आरोग्य संघटनेने जर पुन्हा तपासणी करण्याचे ठरवले तर चीन यासाठी तयार होईल का, हा प्रश्न आहे. कारण, या मुद्द्यावर चीन सुरुवातीपासूनच सहकार्य करण्याच्या मानसिकतेत नाही. तसेच यामध्ये आता अमेरिकेने लक्ष घातल्याने वाद आणखीच चिघळणार आहे. अमेरिकेने चौकशी करण्याची नुसती मागणीच केलेली नाही तर आपल्या परीने याचे उत्तर शोधण्याचेही काम सुरू केले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply