Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

करोना लसीकरण : आलीय चांगली बातमीही; मात्र, आहेत ‘त्या’ नियम व अटीही

दिल्ली : करोनाला रोखण्यासाठी लसीकरण प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढणे गरजेचे आहे. मात्र, देशात लसींची असल्याने लसीकरण धिम्या गतीने होत आहे. एवढेच काय, तर लसीच नसल्याने अनेक राज्यांत लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. नागरिक लस घेण्यासाठी येतात मात्र, लस नसल्याने त्यांमा परत जावे लागते, असे प्रकार तर रोजच घडत आहे. लसी मिळवण्यासाठी राज्य सरकारे त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. लसींसाठी काही राज्यांनी ग्लोबल टेंडर प्रसिद्ध केले होते. परंतु, लस उत्पादक कंपन्यांनी त्यास प्रतिसादच दिला नाही. त्यामुळे राज्यांनी लसींसाठी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. केंद्र सरकारकडून पुरेशा लसी मिळत नसल्याचीही राज्यांची तक्रर आहे, आणि या तक्रारीत तथ्य असल्याचेही दिसत आहे. विरोधक तर या मुद्द्यावर रोजच केंद्र सरकारवर आरोप करत आहेत. लसीकरणाचा असा गोंधळ सुरू असतानाच लसींबाबत एक चांगली बातमी मिळाली आहे.

Advertisement

अमेरिकेची लस उत्पादक कंपनी फायजर याच वर्षात पाच कोटी लस देण्यास तयार असल्याची माहिती मिळाली आहे. कंपनी लस देईल मात्र, यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. जगभरात १४.७ कोटी लसींचे डोस कंपनीने दिले आहेत, आणि चांगली गोष्ट या लसीचा दुष्परिणाम होतोय, अशी तक्रार आलेली नाही. कंपनी २०२१ या वर्षात भारतास पाच कोटी लस देण्यास तयार आहे. मात्र, यासाठी कंपनीच्या काही अटी आहेत. लसींबाबत कंपनी फक्त केंद्र सरकारबरोबरच चर्चा करेल. लसींचे पैसे सुद्धा केंद्र सरकारने कंपनीस द्यावेत, लस खरेदी केल्यानंतर लसींच्या वितरणाची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी. तसेच केंद्र सरकारने नुकसान भरपाई करार सुद्धा करावा असे कंपनीने म्हटले असून आवश्यक कागदपत्रे पाठवली आहेत.

Loading...
Advertisement

फायजर प्रमाणेच मॉडर्ना कंपनीच्या लसी सुद्धा उपलब्ध होऊ शकतात. मात्र, यासाठी एक वर्ष वाट पहावी लागेल. याचे कारणही कंपनीने दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीकडे अमेरिका वगळता दुसऱ्या देशात लस पाठवण्यासाठी आज पुरेशा लसी नाहीत. त्यामुळे या वर्षात दुसऱ्या देशास लस देणे कंपनीला शक्य होणार नाही. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी सुद्धा या वर्षात अन्य देशांना लस पुरवठा करण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती आहे. दरम्यान, देशात लसींची मागणी वाढली आहे. फायजर, मॉडर्ना यांसारख्या कंपन्यांकडून लस खरेदी करुन राज्यांना द्यावी, अशी मागणी राज्ये करत आहेत. केंद्र सरकारही या दृष्टीने आता प्रयत्न करत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply