Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कुत्र्यांच्यामार्फतही पसरतोय ‘तो’ विषाणू; पहा किती आहेत याचे दुष्परिणाम

मुंबई : करोना विषाणूच्या संकटात हैराण असलेल्या जगात काळ्या, पांढऱ्या आणि पिवळ्या बुरशीने डोके वर काढले आहे. त्यामुळे समाजात आणखी भीतीचे वातावरण असतानाच आता कुत्र्यांच्या मार्फत करोनासारखाच एक विषाणू पसरत असल्याची बातमी येऊन धडकली आहे. मलेशियाच्या संशोधकांनी यावर काम सुरू केले आहे.

Advertisement

मलेशियामधील वैज्ञानिकांना एक नवीन व वेगळा असा कोरोना व्हायरस सापडला आहे. असे मानले जाते की, त्याची उत्पत्ती कुत्र्यांपासून झाली आहे आणि काही वर्षांपासून बऱ्याचजणांना या विषाणूची लागण झाली आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, याची ठोस पुष्टी झाल्यास प्राण्यांपासून मनुष्यांपर्यंतचा आलेला हा आठवा व्हायरस असेल. त्याच वेळी कुत्र्यांच्या मार्फत आलेला हा पहिला विषाणू असेल. कुत्रा हा प्राणी मनुष्याचा सर्वात चांगला मित्र असल्याचे म्हटले जाते. जर असे झाले तर मग त्या मित्रात्वात बाधा येऊ शकते. मात्र, आता आलेला हा विषाणू तितका भयंकर नसल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

मानवांमध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण होऊन महामारीने जगभरात विनाश सुरू असताना मलेशिया देशातून ही बातमी आलेली आहे. संशोधकही यामुळे आश्चर्यचकित आहेत. मागील २० वर्षांपासून व्हायरसवर कार्य करणारे संशोधक डॉ. ग्रेगरी ग्रे यांनी आपल्या एका विद्यार्थ्यास कोरोना विषाणूच्या सध्याच्या तपासणीच्या पलीकडे एक शक्तिशाली टेस्टिंग टूल बनवण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यातून नवीन माहिती पुढे येत आहे. ग्रेगरी आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे असे उपकरण तयार केले जे इतर कोरोना विषाणूंविषयीचे पुरावे शोधू शकणार आहे. या साधनाच्या साहाय्याने मागील वर्षी अनेक नमुने तपासण्यात आले होते. तेव्हा कुत्र्यांचा संभाव्य दुवा उघडकीस आला होता. हे नमुने मलेशियाच्या सर्वेक येथील रुग्णालयातील रूग्णांचे होते. हे लोक 2017 आणि 2018 या वर्षात निमोनियासारख्या लक्षणांसह आजारी होते.

Advertisement

यातील बहुतेक रुग्ण हे मुले आहेत. नवीन साधन वापरुन ग्रेगरीच्या चमूने तपासणी केल्यावर कोरोना विषाणूची लागण झालेल्या 301 पैकी 8 नमुने हे कुत्र्यांकडून लागण झालेले होते. ग्रेगरीने म्हटले आहे की, रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचे प्रमाण खूप जास्त आहे. याचे रिझल्ट अत्यंत उल्लेखनीय आहेत. या पथकाने त्यांच्या निकालांची पुष्टी करण्यासाठी अमेरिकेतील ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीच्या प्रख्यात व्हायरोलॉजिस्ट अनास्तासिया व्लासोवा यांच्याकडे हे संदर्भासाठी पाठवले आहेत.

Loading...
Advertisement

अनास्तासिया यांनी म्हटले आहे की, कुत्र्यांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचा संदर्भ यापूर्वी कधीही नव्हता. तथापि, जेव्हा अनास्तासियाने कोरोना विषाणूच्या जीनोमची तपासणी केली तेव्हा त्याला ग्रेगरीच्या टीमच्या संशोधनाशी सहमत व्हावे लागले. ते म्हणाले की, यातील बहुतेक जीनोम हा कुत्र्याशी संबंधित आहे. ग्रेगरी म्हणाले की, मलेशियात कुत्र्यापासून पसरलेल्या कोरोना विषाणूचे सर्व रूग्ण बरे झाले असून नंतर त्यांच्यात रुग्णांकडून इअतर मानवास संसर्गाची कोणतीही घटना घडलेली नाही. अशा प्रकारे कुत्र्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा धोका सध्यातरी नाही.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply