Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ अहवालाने पडलीय काडी; पहा चीनची कशी वाढलीय डोकेदुखी, बायडेन प्रशासनही आक्रमक

दिल्ली : करोना विषाणू जगात दाखल झाल्यापासून हा व्हायरस नेमका आला कुठून, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र, या प्रश्नाचे उत्तर मिळणे तर दूरच राहिले असून नवाच वाद उभा राहिले आहे. अमेरिकेच्या ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालावरुन हा वाद सुरू झाला आहे. या अहवालावरुन अमेरिका आणि चीन पुन्हा एकदा आमनेसामने आले असून एकमेकांवर आरोप करत आहेत.

Advertisement

नोव्हेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी या प्रयोगशाळेत काम करणारे तीन संशोधक आजारी पडले होते. या संशोधकांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. मात्र, चीनने ही माहिती जगाला कळूच दिली नाही. चीनने जरी हा प्रयत्न केला तरी या देशाचा कावेबाजपणा अखेर समोर आलाच. अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जर्नलने अमेरिकेच्याच एका अज्ञात गुप्तचराचा हवाला देत हा खुलासा केला होता.

Advertisement

यानंतर वादास सुरुवात झाली आहे. चीनला कोंडीत पकडण्यासाठी या अहवालावर अमेरिकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमेरिकेने म्हटले आहे, की करोना विषाणू कसा पसरला, नेमका कुठून हा विषाणू आला, याची पारदर्शकपणे तपासणी होणे गरजेचे आहे. इतकेच नाही तर यासाठी अमेरिकेने चीनचा शत्रू तैवानला निरीक्षक म्हणून नियुक्त करण्याची मागणी केली आहे. अमेरिकेच्या या वक्तव्यानंतर शांत राहिल, तो चीन कसला. चीननेही वेळ न घालवता तत्काळ प्रत्युत्तर दिले. चीनने हा अहवाल अमान्य करत अमेरिका या अहवालाद्वारे खोटी माहिती देत आहे, असा आरोप केला आहे.

Loading...
Advertisement

यानंतर अमेरिकेच्या इंटेलिजन्स एजन्सीने तपासकार्य सुरू केले आहे. या संस्था नोव्हेंबर २०१९ मध्ये वुहानच्या त्या प्रयोगशाळेत नेमके काय घडले होते, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेच्या एक महिन्यानंतरच चीनने कोविड १९ बाबत माहिती जगाला दिली होती. अमेरिकेचे आरोग्य सचिव जेवियर बेसेरा यांनी सांगितले, की या प्रकाराची पारदर्शकपणे चौकशी होण्याची गरज आहे. मात्र, त्यांनी चीनचे नाव घेणे टाळले.

Advertisement

या मुद्द्यावर वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता चाओ लिजियान यांनी यावर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी याच वर्षात वुहानच्या त्या प्रयोगशाळेचा दौरा केला होता. त्यांनी तपासणी पूर्ण केली आहे. त्यांना अशा प्रकारचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे आता जे काही अहवाल येत आहेत, ते खोटे आहेत. आरोग्य संघटनेनेच सांगितले होते की, प्रयोगशाळेतून व्हायरस लीक होण्याची शक्यता नाही. तसेच वुहानच्या प्रयोगशाळेतील कोणताही संशोधक कधी आजारी पडला नव्हता.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply