Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ उद्देशानेच चीनने रचला हा डाव; पहा नेमके काय म्हणणे आहे भाजपचे

दिल्ली : करोना विषाणूने जगात थैमान घातले आहे. हा घातक विषाणू नेमका आला तरी कसा, याचे ठोस उत्तर आजही मिळालेले नाही. मात्र, तरीही हा विषाणू चीनमधूनच जगात पसरल्याचा दावा अनेक देश करत आहेत. या मुद्द्यावर जागतिक पातळीवर राजकारणही पाहण्यास मिळत आहे. भारतातील राजकारणी मंडळीही यासाठी चीनला जबाबदार धरत आहेत. देशात करोना विषाणूने थैमान घातले आहे. चीनचे हे भारता विरोधात षडयंत्रच आहे, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी केला आहे.

Advertisement

काही दिवसांपासून भारत हा चीनला सातत्याने आव्हान देत होता. त्यामुळेच चीनने भारताविरुद्ध व्हायरल युद्ध सुरू केले आहे, असेही त्यांनी सांगितले. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे. त्यांनी पुढे म्हटले, की करोनाची दुसरी लाट स्वाभाविकपणे पसरली की यामागे अन्य काही कारण आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे. चीनने सुरू केलेले हे व्हायरल युद्ध आहे का, या मुद्द्यावर आता वाद सुरू झाले आहेत. भारतास त्रास देण्याच्या उद्देशानेच चीनने हा डाव रचला आहे. याचे कारणही आहे. सध्या फक्त भारतातच दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरू आहे. शेजारील अफगाणिस्तान, बांग्लादेश, पाकिस्तान, भूटान या देशात मात्र करोना विषाणूची दुसरी लाट दिसत नाही.

Advertisement

जागतिक पातळीवर भारताचा मान दिवसेंदिवस वाढत आहे. नेमके हेच चीनला नको आहे. त्यामुळे देशाची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी चीनने हा उद्योग सुरू केला आहे, असा आरोप विजयवर्गीय यांनी केला आहे. दरम्यान, करोना विषाणू चीनमधूनच पसरला असल्याचा आरोप अमेरिकेसह जगातील अनेक देश करत आहे. हा विषाणू नैसर्गिक असे वाटत नाही, त्यामुळे चीनमध्ये नेमके काय घडले होत, याची चौकशी करण्याची गरज असल्याचे मत अमेरिकेतील विषाणू तज्ज्ञ डॉ. एंथनी फाऊची यांनी व्यक्त केले आहे. तसेच जगातील शास्त्रज्ञांनीही अशीच मागणी केली आहे. करोना विषाणूच्या  उत्पत्तीबाबत जागतिक पातळीवरही संभ्रम आहे.

Loading...
Advertisement

चीनने मात्र आपल्यावर होत असलेले आरोप फेटाळले आहेत. वुहान शहरात नेमके काय घडले, याची सर्व माहिती सुद्धा चीनने दिलेली नाही. त्यामुळे चीनवरील संशय बळावत चालला आहे. आताही जे काही अहवाल येत आहेत. त्यातूनही असेच दिसून येत आहे. मात्र, चीनने या कशाचीही दखल घेतेलेली नाही. या संकटात हा देश स्वतःचे मनसुबे साध्य करण्यासाठी वेगाने कार्यवाही करत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply