ब्लॉग : आणि जगभरातील डेव्हलपमेंट ट्रेंड टिकवून आपल्याला असेच पुढे जायचे आहे..
दिवाळखोर व्हेनेझुएलामध्ये महागाईचा भडका.. महीन्याच्या किमान वेतनात एक डझन अंडीसुद्धा मिळू शकत नाहीत.. ईटलीसुद्धा याच वाटेवर.. फक्त युरोपीयन देशांच्या कुबड्यांमुळे अजुन तग धरुन आहे.. अमेरीकेची आर्थिक वाढ निगेटिव्हकडे वाटचाल करत आहे.. ब्रिटन हळुहळु आर्थिक अरीष्टाकडे चाललाय.. आखाती देश दिवसेंदीवस अराजकाकडे ओढले जात आहेत.. जगभरातील मुख्यत्वे विकसीत देशातील नागरीकांची क्रयशक्ती कमी होत आहे.. निर्यातीवर आधारलेल्या चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये यामुळे मंदी आहे.. म्हणुनच चीन सध्या बाहेर देशात जास्तीत जास्त गुंतवणुक करुन आपली उलाढाल वाढवत नेण्याचा प्रयत्न करतोय.. या सगळ्यात आपण कुठे आहोत? आपला भारत कुठे आहे? तीन वर्षांपूर्वी जशी परिस्थिती होती, तशीच करोना संकटाच्या मध्यावरही आहेच की.. कारण, जगाचा ट्रेंड सेट झाला होता आणि तोच आताही कायम आहे.. तोच आपल्याला टिकवायचा आहे..
लेखक : अॅड. श्रीकांत आव्हाड (संस्थापक, रोसलीन बिजनेस सोल्युशन; https://roslinbiz.com/ पुणे)
जगातील एकुन लोकसंख्येपैकी १७% पेक्षा जास्त लोकसंख्येच्या भारत देशावर म्हणुनच या सगळ्या देशांच्या आशा टिकुन आहेत. भारतातील मध्यमवर्गीय आत्ता कुठे खर्च करायला लागलाय.. चंगळवादाकडे चाललाय. हे मार्केट जगभरातील या सर्व देशांना तारणारे आहे. जगातील पाकीस्तान सोडला तर कोणताही देश भारताशी उघड विरोध पत्कारण्याच्या मानसिकतेमधे नाही ते यामुळेच. चिनशी आर्थिक तुलनेत आपण मागे असलो तरी याचे कारण लोकशाही आणि हुकुमशाही व्यवस्थेमधे आहे. पण यामुळे देशाची आर्थीक ताकद कमी होत नाही. वरवर काय दिसतंय यापेक्षा आतली ताकद काय आहे हे महत्वाचे.
१९४० नंतर स्वतंत्र झालेल्या देशांची आजची परिस्थिती पाहिली तर आपण खुप मोठा पल्ला गाठलेला आहे. हे कुणा एका सरकारचं यश म्हणता येणार नाही.. नेहरुंपासुन मोदींपर्यंत सर्वांचा या यशात वाटा आहे. मनमोहनसिंगांच्या आर्थिक क्रांतीनंतर आजच्या GST पर्यंत आपण गाठलेला पल्ला कौतुकास्पद आहे. देशाने सत्तर वर्षात काय केलं हा प्रश्न विचारण्याआधी देश सत्तर वर्षापुर्वी कुठे होता याचा आधी अभ्यास करायला हवा. स्वातंञ्यानंतर आपले पहीले उद्दीष्ट होते ते म्हणजे अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण होणे. त्यासाठी किमान दहा पंधरा वर्षे गेली..
त्यानंतर गावागावत विज पोचवण्याचे काम सुरु झाले.. यानंतर लष्करीदृष्ट्या सक्षम होण्याचे उद्दीष्ट पुर्ण केले गेले..
यानंतर भर दिला गेला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात समृद्ध होण्यावर.. यानंतर काही कारणाने मागे पडलेले आर्थिक समृद्धीचे काम सुरु झाले आणि मागील तीस वर्षात आपण जगातील टाॅप १० अर्थव्यवस्थांमध्ये आलो.. आता टाॅप ५ मध्ये आहोत.
प्रत्येक टप्प्यासाठी दहा ते पंधरा वर्षे गेली आहेत.. आता पुढचा टप्पा आहे तो म्हणजे देशाला आर्थिक शिस्त लावणे ते काम GST पासुन सुरु झाले आहे.. यानंतर रोजगार, दळणवळण, स्वच्छता, सौंदर्य या गोष्टींवर भर असेल.. आता पुर्वीसारखा वेळ लागणार नाही.. तरिही यासाठी किमान पुढचा २५ वर्षांचा प्लॅन तयार असणारच आहे. सरकार कोणतंही असलं तरी पुढील २५ ते ५० वर्षात काय करायचंय याचा रोडमॅप नेहमीच तयार असतो.
सत्तर वर्षात आपण जगातील टाॅप ५ अर्थव्यवस्थांमधे आलो आहोत.. जगातील मोठमोठ्या देशांसाठी त्यांची अर्थव्यवस्था जिवंत ठेवण्यासाठी भारताकडुनच आशा आहे… आणि आपल्यासोबत स्वतंत्र झालेले ९९% देश आज स्वतःचे अस्तित्व टिकवुन ठेवण्यासाठी धडपडत आहेत. सत्तर वर्षात आपण काय मिळवलं? उत्तर ज्याने त्याने स्वतः शोधावं.. मी माझं उत्तर शोधलंय.. नकारात्मक बाबी शोधण्यापेक्षा मी प्रत्येकाच्या सकारात्मक बाबी शोधल्यात…
ता.क. : लेखक श्रीकांत आव्हाड यांनी तीन वर्षांपूर्वी हा लेख लिहिला होता. त्यावेळी जशी परिस्थिती आहे तशीच करोनाच्या जागतिक संकटानंतर राहील असेही नाही. पण, सध्यातरी आहे तसेच जागतिक चित्र कायम आहे. भारताची अर्थव्यवस्था आता काही काळासाठी कृषीकेंद्रित झालेली आहे. नकारात्मक वाढीच्या काळात याच क्षेत्राने आपल्याला तारले आहे. त्यामुळेच आता या आरोग्याच्या संकटाला मूठमाती देतानाच शेतीमधील नकारात्मक सूर कमी करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. कारण, देशाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावण्याचे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी कोविड 19 प्रोटोकॉलचे पालन करा. कारण, सध्या देशाला याचीच गरज आहे. तरच वरच्या लेखातील चित्र कायम राहील. नव्हे, आपल्या देशाची घोडदौड अशीच कायम राहील आणि…
संपादन : सचिन मोहन चोभे
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.